जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उतरता आलेख सुरूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona graph

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उतरता आलेख सुरूचजळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा (corona graph) उतरता आलेख सुरूच आहे. दुसऱ्या लाटेत ( corona second wave) बुधवार (ता. २३)चा दिवस मृत्यूशिवाय (Death) नोंदला गेला. दिवसभरात ४३ नव्या रुग्णांची (Patient) भर पडली, तर सुमारे १६९ रुग्ण बरेही झाले. (jalgaon district corona new patient graph down)

जळगाव जिल्ह्यात एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला. मे व जून महिन्यात नव्या रुग्णांसह सक्रिय रुग्णांमध्ये कमालीची घट आली. जूनच्या शेवटच्या टप्प्यात रोजच्या रुग्णांचा आकडा पन्नाशीच्या आत स्थिर झाला आहे. बुधवारी प्राप्त साडेचार हजार चाचण्यांच्या अहवालात अवघे ४३ नवे रुग्ण समोर आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येने एक लाख ४२ हजार ७२ चा आकडा गाठला. जिल्ह्यातील बरे होणाऱ्यांची संख्या आता एक लाख ३८ हजार ४१२ झाली असून, रिकव्हरी रेट ९७.४२ टक्क्यांवर गेला आहे.


जळगाव शहर शंभरीच्या आत
पहिल्या व दुसऱ्या लाटेतही हॉटस्पॉट ठरलेले व सक्रिय रुग्णसंख्या हजारावर गेलेले जळगाव शहर तीन महिन्यांत प्रथमच शंभरीच्या आत आले आहे. जळगाव शहरात सध्या अवघे ८७ सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार ९१ आहे.


...असे आढळले रुग्ण
जळगाव शहर- १४, जळगाव ग्रामीण- एक, भुसावळ- चार, चोपडा- दोन, पाचोरा- दोन, भडगाव- एक, धरणगाव- तीन, यावल- दोन, एरंडोल- तीन, जामनेर- चार, रावेर- दोन, पारोळा- एक, चाळीसगाव- तीन, बोदवड- एक.


...असे झाले लसीकरण
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह अन्य लसीकरण केंद्रांवर बुधवारी दिवसभरात सहा हजार ९५० जणांना पहिला डोस देण्यात आला, तर ९५६ जणांनी दुसरा डोस घेतला. तरुणाईचा लसीकरणास प्रतिसाद मिळत असून, बुधवारी सहा हजार ५०१ लाभार्थी १८ ते ४४ वयोगटांतील होते.

टॅग्स :Coronavirus