esakal | अन् मुख्याध्यापकाचा प्रत्येक दिवस बनला ‘नो व्हेईकल डे’
sakal

बोलून बातमी शोधा

Headmaster

अन् मुख्याध्यापकाचा प्रत्येक दिवस बनला ‘नो व्हेईकल डे’

sakal_logo
By
रोहिदास मोरे


अडावद (ता. चोपडा) : चोपडा एज्युकेशन संस्थेच्या सर्व शाखांत दर मंगळवारी ‘नो व्हेईकल डे’ (No Vehicle Day) पाळण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्याध्यापक (Headmaster) सुनील पाटील यांनी या उपक्रमाचा प्रारंभ केला. यासाठी त्यांनी स्वतः सायकल (Bicycle) खरेदी करून फक्त मंगळवारीच नव्हे, तर रोज घरापासून शाळेपर्यंतचा ८ किलोमीटरचा प्रवास करून चांगल्या संकल्पाला मूर्त स्वरूप दिले.

हेही वाचा: पोलिसांनी गांभीर्याने न घेतल्याने उसळली दंगल


चोपडा येथील प्रताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील रोज दुपारी चारपासून ३० किलोमीटर सायकलींग करून आपले आरोग्य कसे चांगले राहील, याचा संदेश देत आहेत. सुनील पाटील मुळचे मंगरूळ (ता. चोपडा) येथील असून, श्री. पाटील यांची तीन वर्षांपासून सायकल वारी सुरू आहे. कोरोना काळात त्यांनी चोपड्यापासून ते खर्द, माचला फाटा व वर्डी, मंगरूळमार्गे अडावदपर्यंत ३० किलोमीटर अंतर रोज सायकलवर पार केले. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता ते सायकलींग करतात. शिक्षकाचे वर्तन विद्यार्थी व समाजासाठी दिशादर्शक असते. असाच अनोखा आदर्श सुनील पाटील यांनी सायकलींगतून निर्माण केला आहे. त्यांनी आरोग्याचा मंत्र सातत्यपूर्ण जोपासून नवा पायंडा पाडला आहे.


२०१८ मध्ये प्रताप विद्यामंदिराच्या शताब्दी महोत्सवानिमित्त संस्थेच्या सचिव माधुरी मयूर यांच्या संकल्पनेतून पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम सुरू केला. सचिव माधुरी मयूर मंगळवारी सायकलीने कार्यालयात जातात, ही प्रेरणा श्री. पाटील यांच्यासाठी आदर्श ठरली. त्यांनी कामयतिरिक्त रोज पंकजनगर ते अडावदपर्यंत येऊन जाऊन ३० किलोमीटरचा सायकल प्रवास सुरू केला. त्यांची ही कृती परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा: धुळ्यात गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात..


मी कोरोना पॉझिटिव्ह झालो, पण या सायकलींगमुळेच मला रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासली नाही. एखाद्या दिवशी सायकलींग मिस झाल्यास चुकल्यासारखे वाटते.
-सुनील पाटील, मुख्याध्यापक, चोपडा

loading image
go to top