esakal | पोलिसांनी गांभीर्याने न घेतल्याने उसळली दंगल
sakal

बोलून बातमी शोधा

Police

पोलिसांनी गांभीर्याने न घेतल्याने उसळली दंगल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : खंडेरावनगर-आझादनगर परिसरात मुलीच्या छेडखानीवरून दोन गटांत दंगल उसळली. घटनेच्या मुळाचे अवलोकन करता बाजारात एका तरुणास मारहाण झाल्यावर तो पोलिस ठाण्यात आला होता. ठाणे अंमलदाराने त्याला मेडिकल मेमो देत रवाना केले. मात्र, वेळीच मारहाण करणाऱ्यांच्या शोधात पोलिस (Police) पाठविण्यात आले नाहीत. उपचारानंतर संबंधित तरुण घरी परतल्यानंतर परिसरात दंगल उसळली अन्‌ फौजफाटा रवाना झाला. पोलिसांच्या अटकसत्रात दोन्ही गटांचे २४ संशयित अटक असून, इतरांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा: Jalgaon : खडसे-महाजन वादामुळे सर्वपक्षीय पॅनल वांध्यात

बारकू संतोष भोई याच्या लहान भावाने बहिणीची छेडखानी केल्याच्या रागातून त्याला लायंकाळी सातच्या सुमारास मारहाण झाल्याने जखमी अवस्थेत तो, पोलिस ठाण्यात धडकला. ठाणे अंमलदाराने त्याला कायद्याने मेडिकल मेमो देत उपचारासाठी रवाना केले.

प्रकरणाचे गांभीर्य ओळखले नाही
हाणामारीचा प्रकार, संवेदनशील लोकवस्तीचा परिसर असताना रामानंदनगर पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने हाताळले नाही. परिणामी जखमी उपचार घेऊन आल्यावर रात्री दहाच्या सुमारास दोन गट समोरासमोर येऊन दगडफेकीची घटना घडली. तद्‌नंतर आस्थापना बंदीला गेलेल्या डीबी पथकाला रवाना करण्यात आले. सहाय्यक अधीक्षकही घटनास्थळी वेळेत पोचले.

पोलिसांवरच रोष
मात्र, संतप्त जमावाने पोलिसांविरुद्धचा रोष व्यक्त करत पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. यात सहाय्यक पोलिस अधीक्षकांच्या वाहनावर दगडफेक होऊन दिवा फोडण्यात आला. तीन कर्मचारी जखमी झाले. दंगलीत दोन्ही गटांच्या ७० संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. पहिल्या अटकसत्रात १६ संशयितांना अटक झाली, तर दुसऱ्या अटकसत्रात आठ संशयितांना अटक होऊन न्यायालयाने संशयितांना दोन दिवस कोठडीत रवाना केले. पोलिस फरारी संशयितांचा शोध घेत आहेत.


पहिल्याच रात्री १६ अटकेत
सहाय्यक फौजदार संजय सपकाळे यांच्या तक्रारीवरून दाखल दंगलीच्या गुन्ह्यात पहिल्याच दिवशी पोलिस पथकाने जयेश सीताराम भोई (वय १८), शोएब खान फिरेाज खान (३१), इम्रान बशीर पिंजारी (३१), नवाज शेख वाहेद (२३), महेश काशीनाथ भोई (२४), स्वप्नील संजय नाथ (२५), भूषण दगडू महाजन (२७), रमजान फारुख पिंजारी (२१), समीर नजीर पिंजारी (२०), दानिश बशीर पिंजारी (२०), मुक्तार जाकिर पिंजारी, (२२), समीर शेख सलीम (२१), शेख रईस शेख इस्माईल (२०), इरफान चाँद पिंजारी (३३), केदार यादवसिंग राठोड (२७), लहू ब्रिजलाल धनगर (२८) अशांना रविवारी (ता. ३) अटक करण्यात येऊन त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.

हेही वाचा: Jalgaon : डीडीआर बिडवई असतील निवडणूक निर्णय अधिकारी


आठ संशयितांना कोठडी
फरदीन मोहम्मद पिंजारी (१८), फिरोज बाशिंद पिंजारी (२१) अशांना रविवारी मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले. इमरान ऊर्फ गुड्डू चाँद पिंजारी (२३), तस्लीम ऊर्फ भुऱ्या शकूर पिंजारी (३५), वसीम जुम्मा पिंजारी (२२), सद्दाम जुम्मा पिंजारी (२५), शरीफ सिराज पिंजारी (२५), हकीम अली हुकूमत अली (२२) अशांना सोमवारी सकाळी अटक करण्यात आली. सर्वांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येऊन दोन दिवस पोलिस केाठडीत रवाना करण्यात आले. सरकार पक्षातर्फे ॲड. निखिल कुळकर्णी यांनी कामकाज पाहिले.


हे आहेत फरारी
अश्पाक खान, अज्जू चावल, अख्तर फकीर मोहम्मद पिंजारी, अख्तर दिलेमान पिंजारी, समीर अमीर पटवे, संजय धनगर, सागर कपिल भोई, राकेश अशोक भोई, विकी अशोक भोई, विक्की मिठाराम भोई, नाना भोई, यशवंत भोई, समाधान भोई, मुश्ताक ईदू पिंजारी, इम्रान युनूस पिंजारी, गंभीर सरदार पिंजारी, अनिस युसूनस पिंजारी, शाहिद रशीद पिंजारी, शाहरुख शेख पिंजारी, आवेश पिंजारी, सांदिक शेख मुनाफ व इतरांचा विविध पथके शोध घेत आहेत.

loading image
go to top