
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असली तरी दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चोपडा दर बुधवारी बंदचा निर्णय घेण्यात आला.
चोपडा : येथे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दर बुधवारी कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय चोपडा तालुका व्यापारी महामंडळाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार व्यापारी महामंडळासह प्रशासनाच्या आवाहनास तालुका व शहरातील नागरिक सहकार्य करीत आज शहरात कडकडीत बंद पाळला. त्यामुळे शहरात दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळाला.
आवर्जून वाचा- ‘आमदनी अठ्ठन्नी, खर्चा रुपय्या’ असा नगरपालिकेचा कारभार ! -
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असली तरी दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चोपडा दर बुधवारी बंदचा निर्णय घेण्यात आला. त्याला प्रशासनाने देखील साथ दिलीच आहे. गेल्या बुधवारी काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडून एकजुटीला तडा देण्याचा प्रयत्न केला. परंतु महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व प्रशासनाच्या प्रतिनिधींनी संबधितांना समज दिल्यामुळे दुकाने तत्काळ बंद करीत सहकार्य केले होते. पण पुन्हा तसे होऊ नये, यासाठी मंगळवारी व्यापरी महामंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर प्रशासनाच्या वतीने दोन हजार रुपये दंड करण्याचा इशारा देण्यात आला.
आवश्य वाचा- ग्रामपंचायतने लढवली शक्कल; महिला बचत गटाला कर वसुलीची दिली जबाबदारी, परिणाम दिसला
या बैठकीला व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृतराज सचदेव, संजय कानडे, जीवन चौधरी, अनिल वानखेडे, सुनील बरडिया, श्याम सोनार, संजय श्रावगी, राजेंद्र जैन, नरेंद्र तोतला, प्रफुल्ल स्वामी, नरेश महाजन, प्रा. रवींद्र बडगुजर, मुरलीधर पाटील, घनःश्याम माखिजा, गोपाळ पाटील, पुंडलिक माळी, प्रमोद अग्रवाल आदी उपस्थित होते.
वाचा- शहर झगमगणार, दोन कोटीही वाचणार; कसे ? -
‘नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चोपडा तालुका व्यापारी महामंडळासह प्रशासनाने बुधवारी (ता. २३) बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने, प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. तसेच विविध कार्यालये देखील बंद होती. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. ‘जनता कर्फ्यू’ शंभर टक्के यशस्वी झाल्याच दावा महामंडळाने केला आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे