सख्‍ख्‍या बहिणींऐवजी चुलत भावाला केले कोट्याधीश; संपत्‍ती पाहून बसला धक्‍का

sister and brothe
sister and brothe

चोपडा (जळगाव) : आर्थिक श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती खूप मोठी असते, याचाच प्रत्यय मजरे हिंगोणा (ता. चोपडा) येथील इंदूबाई बाप बुधा महाले (वय ७८) या वृद्ध महिलेने दोनशे रुपये रोजंदारीने भिवंडी (ठाणे) येथे कंपनीत काम करून पोटाची खळगी भरणाऱ्या चुलत भाऊ रामा दोधु महाले यास भिवंडी येथून बोलावून सुपूर्द केली.

भावाला बसला धक्‍काच
स्वकष्टाने कमविलेली संपत्तीमधील सोने, बांधीव घर, बखळ प्लॉट, बैलजोडी, वि. का. सोसायटी व कारखाना शेअर्ससह रोख रक्कम सुपूर्द केली. अनभिज्ञ असलेल्‍या भावाला अचानक घडलेल्‍या अशा प्रकाराने काही वेळपर्यंत उमजत नव्हते. परंतु हे सर्व खरे आहे व सर्व हे तुलाच देत आहे; असे खुद्द इंदूबाईंनी जमवलेली चार लोकांसमोर सांगितले. यावेळी रामा महालेची पत्नी राजकोर महाले, दोन्ही मुले अजय महाले, विजय ही देखील होते.

कायदेशीर प्रक्रिया
यावेळी इंदूबाई महाले यांनी खुद्द वेंडर रवींद्र मराठे व ऍड.चंद्रकांत सोनवणे यांच्याकडून नियमानुसार लेखापडी करून दिलेली संपत्ती ची कायदेशीर प्रक्रिया करून घेतल्याने भविष्यात कुणालाच अडचण येणार नाही 

ही संपत्ती दिली भावाला
इंदूबाई यांनी चुलत भाऊ रामा महाले यांना मजरे हिंगोणे गावातील २५ लाख रुपयांचे १८०० स्क्वेअर फुटाचे बांधीव घर, आपल्या जवळील सोन्याच्या दहा तोड्याच्या बांगड्यासह वस्तू, बैलगाडी जोडी, ७०० स्क्वेअर फुटाचा बखळ प्लॉट, विकासोचे ३ लाख ५० हजार रुपयांचे शेअर्स, चोपडा साखर कारखाना शेअर्स, या हंगामातील ७ ते ८ लाख रुपयांचा येणारा शेतमाल, रोख रक्कम असा लाखो रुपयांची संपत्ती दिली.

जिवंतपणी गावास अन्नदान
इंदूबाई यांनी जिवंत असतांना माझ्यासमोर संपूर्ण गावाला अन्नदान करावयाचे आहे. अशी इच्छा व्यक्त केल्याने मजरे हिंगोणा व मौजे हिंगोणा या तीन- चार हजार लोकसंख्या असलेल्या दोन्ही गावांना विजयादशमीनंतर गावजेवण दिले जाणार आहे.

बहिणीने केली भावाची रक्षा
भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ- बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. बहिण- भावाच्या प्रेमाचे प्रतीक या सणाच्या संबंधी आहे. यात बहिणीने भावाला राखी बांधल्यानंतर भावाने बहिणीचे रक्षण करावयाचे असते. पण येथे उलट झाले; खुद्द बहिणीने स्वकष्टाने कमावलेली संपत्ती चुलत भावास दान केल्याने भावाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. बहिणीने आपली संपत्ती चुलत भावास दान केल्याची जिल्ह्यात पहिलीच घटना असेल.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com