47 ग्रामपंचायतींच्या निवडणूका 15 जानेवारीला; आचार संहिता लागू

दगडू पाटील
Monday, 14 December 2020

आचार संहिता ग्रामपंचायतींच्या निवडणुक कार्यक्रम जाहिर केल्यापासुन ते निवडणुकीचा निकाल जाहिर होईपर्यंत लागु राहणार असल्याचे आयोगाकडून आदेशित करण्यात आलेले आहे.

धरणगाव : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानवये जिल्ह्यासह जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे.  यात धरणगाव तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम लागला असून तालुक्यात आचारसंहिता लागू झालेली आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक करीता मा. राज्य निवडणुक आयोग यांचेकडील दिनांक 29 नोव्हेंबर मधील आदेशानुसार आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आव्हाहन तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी केले आहे.

 आवश्य वाचा-..अन् बाराशे रुपयांत ‘आयजी’ 

जळगाव जिल्हयात माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 20 या कालावधीत मुदत संपणा-या एकुण 783 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता मा. राज्य निवडणुक आयोग, मुंबई यांचेकडील दिनांक 11 रोजीच्या पत्रान्वये संगणकीकृत पध्दतीने प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. जिल्हयातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून दिनाक 18 रोजी मतमोजणी होणार आहे. मा. राज्य निवडणुक आयोग यांचेकडील दिनांक 29 नोव्हेंबर 20 रोजीच्या आदेशान्वये ज्या जिल्हयामध्ये 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक प्रभाग मध्ये ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक आहे त्या संपूर्ण जिन्हयामध्ये आचार संहिता लाग राहील, त्यानुसार तालुक्यात आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. 

आवर्जून वाचा- समोस्‍याची चव बिघडली; कारण आहे बटाटा

आचार संहिता ग्रामपंचायतींच्या निवडणुक कार्यक्रम जाहिर केल्यापासुन ते निवडणुकीचा निकाल जाहिर होईपर्यंत लागु राहणार असल्याचे आयोगाकडून आदेशित करण्यात आलेले आहे. धरणगाव तालुक्यातील निवडणूक कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार,लक्ष्मण सातपुते, प्रथमेश मोहळ, गणेश पवार यांच्यासह तहसील कर्मचारी परिश्रम घेत आहेत.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dharangaon gram panchayat elections fifteen january