esakal | टॉसिलीझुमाब इंजेक्शनचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली

बोलून बातमी शोधा

injection
टॉसिलीझुमाब इंजेक्शनचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवाजळगाव ः आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाच्या आदेशान्वये टॉसिलीझुमाब (Tocilizumab) हे इंजेक्शन जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली संबंधित शासकीय/खाजगी रुग्णालयास वाटप करण्याबाबतचे निर्देश मे. सिप्ला लि या कंपलीन निर्गमित करण्यात आलेले आहेत.
आदेशानुसार निर्गमित करण्यात आलेल्या सुचनांचे जळगाव जिल्ह्यातील सर्व मेडीकल डिलर्स, सर्व घाऊक मेडीकल विक्रेते यांना पालन करणे बंधनकारक राहील.

हेही वाचा: उमवितील विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्रे आता ‘डिजिलॉकर’मध्ये

जिल्ह्यातील सर्व मेडीकल डिलर्स, सर्व घाऊक मेडीकल विक्रेते टॉसिलीझुमाब या इंजेक्शनचा साठा प्राप्त झाल्यास त्यांनी त्याबाबतची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव व औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन कार्यालयास द्यावी.
जिल्ह्यातील सर्व मेडीकल डिलर्स, सर्व घाऊक मेडीकल विक्रेते यांना जिल्हाधिकारी यांच्या लेखी परवानगीशिवाय टॉसिलीझुमाब या इंजेक्शनचे वितरण किरकोळ मेडीकल विक्रेते यांना करता येणार नाही.

हेही वाचा: रोगापेक्षा इलाज भंयकर..लसीकरण केंद्रावर धुमाकूळ !

या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, आपत्ती व्यवस्थापन कायदा व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी सांगितले.

संपादन - भूषण श्रीखंडे