
सुमारे अर्धा तास राष्ट्रीय महामार्गावर कॉंग्रेस पदाधिका-यांनी आंदोलन केल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
एरंडोल : केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर मंजूर केलेले कृषी विधेयके मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी कोंग्रेसच्यावतीने राष्ट्रीय महामर्गावर धरणगाव चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन केले.यावेळी तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना कॉंग्रेस पदाधिका-यांनी निवेदन दिले.
वाचा- Bharat Band Updates : कृषी विधेयकाविरोधात जळगाव शहरात बंदला प्रतिसाद -
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विधेयकांमुळे शेतकरी उध्वस्त होणार असल्यामुळे सर्व विधेयके मागे घेण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.देशातील काही मोठ्या उद्योगपतींचा फायदा व्हावा या एकमेव उद्देशाने सदरची विधेयके मंजूर करण्यात आली असल्याचा आरोप तालुकाध्यक्ष विजय महाजन यांनी केला.केंद्र सरकारने कृषी विधेयके मागे न घेतल्यास पक्षातर्फे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.यावेळी.डॉ.फरहाज बोहरी यांनी कृषी विधेयके कशी फसवी आहेत आणि यामुळे शेतक-यांचे कसे नुकसान होणार आहे. याबाबत माहिती दिली.सुमारे अर्धा तास राष्ट्रीय महामार्गावर कॉंग्रेस पदाधिका-यांनी आंदोलन केल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्रसरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
वाचा- जळगाव जिल्ह्यात १५ हमीभाव खरेदी केंद्रांना प्रारंभ
तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना निवेदन देण्यात आले.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन,शहराध्यक्ष संजय भदाणे,युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष इमरान सय्यद,शेतकी संघाचे संचालक प्रकाश ठाकूर,डॉ.फार्हाज बोहरी,सेवादलाचे तालुकाध्यक्ष संजय कलाल,सुरेश पवार,भीमराज शिंदे, भिकाजी अहिरे,विनायक पाटील,विठ्ठल पाटील,रामकृष्ण पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अमित पाटील, सुदर्शन महाजन,बबन वंजारी यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादन- भूषण श्रीखंडे