esakal | अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांना दिलासा;जळगावला मिळणार ३५ कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

Damage Crop

अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांना दिलासा;जळगावला मिळणार ३५ कोटी

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : मार्च ते मेदरम्यान राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Heavy Rain) शेतकऱ्यांचे (Farmes) प्रचंड नुकसान झाले. त्यांना मदत करण्यासंबंधी १२२ कोटींच्या निधीला राज्य मंत्रिमंडळाच्या (State Cabinet) उपसमितीने मंजुरी दिली असून या निधीतून (Funding) सर्वाधिक ३५ कोटींचा निधी जळगाव जिल्ह्याला मिळणार आहेत.

हेही वाचा: वेध नवरात्रोत्सवाचे अन्‌ पोलिस दल सावधान!


गेल्या मार्च, एप्रिल व मे २०२१ या तीन महिन्यात राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस झाला होता. जळगावसह धुळे जिल्ह्यासही अवकाळी पावसाचा फटका बसला होता. जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान होऊन रब्बीचे उत्पादन नष्ट झाले होते. नुकसानीचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत करण्यासंबंधी शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला होता.


राज्यात १२२ कोटींचा निधी
सर्वच महसूल विभागात कमी- अधिक प्रमाणात नुकसान झाल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने मदत देण्यासंबंधी १२ मे २०२१ला झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. त्यानुसार १२२ कोटी २६ लाख ३० हजारांच्या निधीचा प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात आला, त्यास समितीने मंजुरी दिली आहे.

जळगावला ३५ कोटी
राज्यभरातील विविध जिल्ह्यांना या मदतीच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान झालेले असल्याने स्वाभाविकपणे जळगावसाठी यापैकी ३५ कोटी ३५ लाखांचा निधी मिळणार आहे. धुळे जिल्ह्यासाठी २ कोटी २६ लाख ९७ हजार, नाशिकसाठी ११ कोटी ६७ लाख २३ हजार, नगर जिल्ह्यासाठी १० कोटी ६ लाख ८१ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा: Jalgaon : जिल्ह्यात कोरोनाचे दोन नवे बाधित


विभागनिहाय मंजूर निधी
कोकण : २९ कोटी ३० लाख
पुणे : ३ कोटी १६ लाख ७५ हजार
नाशिक : ५९ कोटी ३६ लाख ३४ हजार
औरंगाबाद : १५ कोटी ५१ लाख ५४ हजार
नागपूर : ५ कोटी ४ लाख ८१ हजार
एकूण : १२२ कोटी २६ लाख ३० हजार

loading image
go to top