esakal | Jalgaon:अनैतिक संबंधाचा संशय..डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Jalgaon:अनैतिक संबंधाचा संशय..डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगावः तालुक्यातील सावखेडा गावात एका चाळीस वर्षाचा इसमाचा डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून (Murder) झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. अनैतिक संबंधाच्या संशयावरून हा खून झाला असून मारेकरी हा स्वतःहून पोलिसांच्या (Police) स्वाधीन झाला आहे.

हेही वाचा: अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांना दिलासा;जळगावला मिळणार ३५ कोटी

जळगाव जिल्ह्यात काही महिन्यापासून खून, गोळीबार, चोऱ्यांचे घटना वाढत असून पोलिस प्रशासनाने देखील गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केली आहे. परंतू बुधवारी सावखेडा गावात पून्हा खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनूसार सावखेडा गावातील श्रावण लालचंद भिल उर्फ सोनवणे (वय ४०) यांचा भैय्या मदन पावरा (वय २८) याने डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. मदन पावराने त्याच्या पत्नीशी श्रावण भिल याचे अनैतिक संबधाचा संशयावरून हा खून केला तपासातून समोर येत आहे.

पत्नीला, सासूला गावाला पाठवले..

पत्नीशी श्रावण भिल याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय भैय्या पावरा याला होता. त्यामुळे श्रावण याचा काटा काढण्यासाठी तीन दिवसापूर्वी पत्नीला व सासूसोबत गावाला पाठवून दिले होते. बुधवारी रात्री श्रावण भिल व भैय्या हे दोघी दारू पिण्यास बसले आणि त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि भैय्या पावरा याने श्रावण याच्या डोक्यात कुऱ्हाड मारली. यात श्रावण यांचा जागीच मृत्यू झाला.

संशयीत पोलिस पाटल्याची घरी गेला

संशयीत भैय्या पावरा हा पोलिस पाटील उत्तम दगडू चौधरी यांच्याकडे एक वर्षापासून कामाला होता. त्यातच त्याने खून श्रावण याचा खून केल्यानंतर पोलिस पाटील यांच्याकडे येवून घटना सांगितली. पोलिस पाटील यांनी त्याला पोलिसांच्या स्वाधिन केले.

हेही वाचा: वेध नवरात्रोत्सवाचे अन्‌ पोलिस दल सावधान!

घटनास्थळी पोलिस अधिकारी

रात्री घटना घडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पोलीस उपअधीक्षक कुमार चिंता यांच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झाला होता.

loading image
go to top