जिल्ह्यात 92 टक्के खरिपाच्या पेरण्या...सर्वाधिक पेरा कपाशीचा !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

जिल्ह्यात 92 टक्के पेरण्या झाल्या आहेत. पाऊसही बरा आहे. मात्र अजून एक- दोन दमदार पाऊस झाला, की पिकांच्या वाढीसाठी तो पूरक ठरेल. सर्वाधिक पेरा कपाशीचा आहे. 
- संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी 

जळगाव : शहर व जिल्ह्यात शनिवारी (ता.4) रात्री व रविवारी (ता.5) दुपारी झालेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. पावसाने तब्बल 13 दिवसांची ओढ दिली होती. मुंबईत पावसाच्या जोरदार आगमनानंतर आता जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपासून कमी- अधिक प्रमाणात पाउस पडत आहे. आतापर्यंत 92 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्वाधिक पेरा कपाशीचा पाच लाख 847 हेक्‍टरवर झाला आहे. 

जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या सात लाख 57 हजार 515 हेक्‍टर क्षेत्रावर अपेक्षित आहेत. आतापर्यंत सहा लाख 96 हजार 560 हेक्‍टरवर पेरण्या झाल्या आहेत. यात कपाशीचा पेरा पाच लाख 847 हेक्‍टरवर झाला आहे. कपाशीला यंदा मिळालेला चांगला भाव हेच मुख्य कारण जादा कापूस पेरण्याचे आहे. 

जिल्ह्यात झालेल्या काही पिकांच्या पेरण्या अशा  
पीक--हेक्‍टर 
कापूस-- पाच लाख 847 हेक्‍टर 
मका--76 हजार 544 
ज्वारी--38 हजार 514 
डाळी-49 हजार 81 
उडीद--18 हजार 704 
मूग--20 हजार 626 
तूर--नऊ हजार 459 
तेलबिया--22 हजार 809 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon 92 percent kharif sowing in the district.