‘ना’ सोने ‘ना’ नवीन वाहनांची खरेदी ! कोरोनामुळे 
उलाढाल ठप्प

‘ना’ सोने ‘ना’ नवीन वाहनांची खरेदी ! कोरोनामुळे उलाढाल ठप्प

कोरेाना संसर्गाने सर्वच व्यवसायांची आर्थिक गणीते थांबविली आहेत.

जळगाव ः साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त असलेला अक्षय तृतीया (Akshay Tritiya) या सणाला (festival) हिंदू संस्कृतीत (Hindu culture) अनन्य साधारण महत्व आहे. यादिवशी शुभ कार्याची सुरवात केली की ते अक्षय तृतीयेप्रमाणे अक्षय राहते अशी म्हण आहे. यामुळेच बहुतांश नागरिक हा मुहूर्त साधत शुभ कार्याची सुरवात करतात. कोणी नवीन सोने खरेदी (gold) करतो तर कोणी नवीन (vehicles) वाहने खरेदी करतो. मात्र सलग दुसऱ्या वर्षीही कोरोना ( corona) संसर्गाच्या निर्बंधामुळे अक्षय तृतीयेला बाजारपेठेत (market stop) होणारी सुमारे पाचशे कोटीची उलाढाल यंदाही ठप्पच होती.

( Akshay Tritiya importance festival corona effect market stop)

‘ना’ सोने ‘ना’ नवीन वाहनांची खरेदी ! कोरोनामुळे 
उलाढाल ठप्प
विजयवाडा शहरातील ही आहेत सर्वोत्तम शॉपिंगचे ठिकाणे !

अक्षय तृतीया शुभ मुहूर्त आहे. यामुळे यादिवशी सोने खरेदीची परंपरा आहे. यादिवशी महिला सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर करतात. कुटूंबियांसाठीही सोन्याची खरेदी होती. यादिवशी सकाळी आठपासून रात्री उशिरापर्यंत सोने खरेदीसाठी सराफ बाजारातील सर्वच दुकानात खरेदीसाठी झुंबड उडते. गतवर्षीही लॉकडाऊन होते व यंदाही लॉकडाऊन असल्याने सोन्याची दुकाने बंदच आहे. शहरासह जिल्ह्यात सुमारे चारशे कोटींची उलाढाल यादिवशी होते. ती पूर्णपणे ठप्प होती. सोने खरेदी बरोबरच नवीन दूचाकी, चारचाकी, इलेक्टॉनिक वस्तू, मोबाईल, संगणक लॅपटॉपची खरेदी होते. यंदाही दुकानेच बंद असल्याने या वस्तूंची खरेदी करता आली नाही. यादिवशी नवीन घरात प्रवेशही केला जातो. मात्र अनेकांचे तेही स्वप्न अपूर्णच राहिल्याचे चित्र होते. एकंदरीत कोरेाना संसर्गाने सर्वच व्यवसायांची आर्थिक गणीते थांबविली आहेत.

घरोघरी घागरींचे पुजन

अक्षय तृतीयेला पुर्वजांचया नावाने घागर भरून गोडधोड नैवेद्य दाखविला जातो. पुर्वजांचे स्मरणकरीत त्याच्या नावाने अग्नीत घास टाकून पितरांना तृप्त करण्याची परंपरा आहे. यामुळे आज हिंदू बांधवांनी आपापल्या घरी घागर भरून, नैवेद्य दाखवून पितरांना तृप्त करून आर्शिवाद मिळविण्यासाठी प्रयत्न केले.

‘ना’ सोने ‘ना’ नवीन वाहनांची खरेदी ! कोरोनामुळे 
उलाढाल ठप्प
भारतातील ही आहेत चमत्कारी मंदिरे..!

माहेरवाशींनी सासरीच..

ग्रामीण भागात सासरवाशीन महिला माहेरी येतात. अक्षयतृतीयेनिमित्त सांजोरी, करंजी करतात. आपल्या मैत्रीणींना भेटून जून्या आठवणींना उजाळा देतात. झाडाला झोका टाकून आखाजीची गाणीही गातात. मात्र यंदा कोरोना ससंर्गाची निर्बंध असल्याने अनेक माहेरवाशींना माहेरी जाता आले नसल्याचे चित्र होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com