esakal | अमळनेर परिसरातील गावे होणार पाणीदार
sakal

बोलून बातमी शोधा

water problem solve

अमळनेर परिसरातील गावे होणार पाणीदार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमळनेर (जळगाव) : मतदारसंघातील विविध नद्या- नाले यांच्यावर छोटे सिमेंट बंधारे (cement bandhara) तयार करून त्या त्या परिसरातील सिंचन पातळी वाढावी व विहिरींना पाणी वाढावे या दृष्टिकोनातून आमदार अनिल पाटील यांनी तब्बल २० बंधाऱ्यांसाठी पाठपुरावा केला. त्यात मृद जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Minister shankarrao gadakh) यांनी मंजुरी दिली असून, २० बंधाऱ्यांना मंजुरी प्राप्त झाली आहे. (jalgaon amalner taluka aria village water problem solve)

हेही वाचा: आता..रोबोटही करणार शेतीची कामे !

अनेक वर्षांपासून अमळनेर मतदारसंघ हा अवर्षणप्रवण भाग असून, मागे तब्बल ४ वर्ष येथील जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागला. मतदारसंघात अनेक छोटे मोठे नाले आहेत. यांच्यातील पाणी पावसाळ्यात वाहून नद्यांना मिळते. यासाठी सरपंचांशी चर्चा करून आधी सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यानुसार बंधाऱ्यांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यानंतर ते मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या कानावर ही बाब टाकली. त्यांनी लगेच कार्यवाही करत यास मंजुरी दिली. औरंगाबाद दौऱ्यावर मंत्री गडाख असताना महामंडळाच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत निर्देश दिले व ती यादी मंजूर केली. लवकरच या कामांना गती मिळणार असून, यामुळे मतदारसंघातील गावांना याचा फायदा होणार आहे. याबाबत गावकऱ्यांनी आमदार अनिल पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

हेही वाचा: पोलिसाची इस्त्रीवाल्यास पिस्तुलीने उडवण्याची धमकी

अमळनेर मतदारसंघ हा अवर्षणप्रवण भाग आहे. मागील तब्बल ४ वर्ष येथील जनतेने दुष्काळाचे चटके सोसले आहेत. यातून बाहेर काढण्यासाठी मतदारसंघात अनेक छोटे मोठे नाले होणे गरजेचे होते. तालुक्यात २० बंधारे झाल्यास मतदारसंघ पाणीदार झाल्याशिवाय राहणार नाही.

- अनिल पाटील, आमदार, अमळनेर

निधी मंजूर झालेली गावे

फाफोरे खुर्द, शहापूर, बेटावद बंधारा, शिरसोदे (१), शिरसोदे (२), आंबापिंप्री (१), आंबापिंप्री (२), आंबापिंप्री (३), आंबापिंप्री (४), आंबापिंप्री (५), सबगव्हाण (ता. पारोळा) (१), सबगव्हाण (ता. पारोळा) (२), शेळावे बुद्रुक (१), शेळावे बुद्रुक(२), इंधवे (१), इंधवे (२), बहादरपूर, धाबे, कुर्हे बुद्रुक, रामेश्वर, भिलाली या गावांना १३ कोटी ४० लाखांचा निधी बंधाऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे.

loading image