esakal | आता..रोबोटही करणार शेतीची कामे !
sakal

बोलून बातमी शोधा

आता..रोबोटही करणार शेतीची कामे !

आता..रोबोटही करणार शेतीची कामे !

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ : तंत्रज्ञान (Technology) आणि नावीन्यपूर्ण युगात दररोज जग तंत्रज्ञानासह पुढे जात आहे. दिवसेंदिवस नवीन ‘इनोव्हेशन्स’ (Innovations) आणण्यासाठी एसएसजीबीचा (SSGB) टीम कॉम्पबॉट्ज सर्वोत्तम प्रयत्न करीत आहे. श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान भुसावळच्या संगणक विज्ञान विभागाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थी सोहेल हमीद कच्छीने कृषी (Agriculture) शेती (farming) रोबोट (Robot) विकसित करून राष्ट्रीयस्तरावरील (National level) स्पर्धेत Competition) प्रथम क्रमांक मिळविला.

(Engineering Technology student National level Competition farming help Robot innovations)

हेही वाचा: कोरोनात टायफॉइडची टेस्टही येते पॉझिटिव्ह

जागतिक पातळीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये ज्या वेगाने वाढत आहे, त्या तुलनेमध्ये भारत अद्याप प्रचंड मागे आहे. अलीकडे शेतीमध्ये कष्टाच्या कामासाठी मनुष्यबळ उपलब्धता कमी होत .आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत यंत्रमानव शेतकऱ्यांची सर्व कामे करून मदत करू शकतो. असा प्रकल्प गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने साकारला आहे. हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे. टी. अग्रवाल, सचिव एम. डी. शर्मा, संस्थेचे प्राचार्य डॉ. आर. पी. सिंह, अकॅडमीक डीन डॉ. आर. बी. बारजिभे, कॉम्प्युटर सायन्सचे विभागप्रमुख डॉ. डी. डी. पाटील व सर्व प्राध्यापकांनी त्याचे कौतुक केले.

"अ‍ॅग्रोबॉट" रोबोटचा शेतीसाठी फायदा

विद्यावर्धिनी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, वसईतर्फे राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प शोकेस स्पर्धा १४- १५ मे २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. जिथे संपूर्ण भारतातील ३०० हून अधिक सहभागींनी भाग घेतला आणि रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, औद्योगिक क्षेत्र, कृषी आणि बरेच काही यासारख्या डोमेनमध्ये त्यांचे नावीन्यपूर्ण प्रदर्शन केले.

हेही वाचा: धुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीला ‘ब्रेक’ !

कॉम्पबॉट्ज टेक्निकल लॅबद्वारे रोबोटिक्सवर मार्गदर्शन

एस.एस.जी.बी.सी.ओ.ई.टी. कॉलेजमधून सोहेल हमीद कच्छीने ट्रॅक ३ मायनर प्रोजेक्ट शोकेसमध्ये भाग घेतला आणि यशस्वीरित्या पहिला क्रमांक मिळवला आणि ट्रॅक ३ यशस्वीरित्या जिंकला. एस.एस.जी.बी.सी.ओ.ई.टी. कॉलेज, संगणक विज्ञान विभाग भुसावळ यांनी एक अभिनव आणि रोबोटिक्स लॅब सुरू केली आहे ज्याला "कॉम्पबॉट्ज़ टेक्निकल लॅब" म्हणून ओळखले जाते. कॉम्प्युटर सायन्सचे विभागप्रमुख डॉ. दिनेश. डी. पाटील यांच्या मदतीने सीएसई विभागातील टीम लीडर सोहेल कच्छी आणि त्यांच्या टीमने विविध स्पर्धा खेळल्या आणि त्यातील अनेक जिंकली.

loading image
go to top