esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

जळगावः मनसेचे मनपासमोर ‘झोपा काढा’ आंदोलन

जळगावः मनसेचे मनपासमोर ‘झोपा काढा’ आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


जळगाव : शहरामध्ये गेल्या तीन वर्षांपासून ‘अमृत’अंतर्गत पाणीपुरवठा योजना (Water supply scheme) भूमिगत गटारांचे काम सुरु असून शहरातील सर्वच रस्त्यांची वाट लागली असून याबाबत वारंवार निवेदनही देऊन मनपा प्रशासन ढिम्म आहे. त्याच्या निषेधार्थ मनसेने (MNS)आज मनपा इमारतीसमोरच ‘झोपा काढा’ आंदोलन (Movement)केले.

हेही वाचा: जळगावातील धार्मिक स्थळे गुरूवारपासून सुरू होणार!असे आहेत नियम..


रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ऐन पावसाळ्यात जनतेला नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. याबाबत आयुक्तांना निवेदने देऊन, वेळोवेळी आंदोलने करूनही प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. त्या प्रशासनाला उठविण्यासाठी आज सकाळी मनपा इमारतीत ‘झोपा काढा’ आंदोलन मनसे जिल्हा सचिव ॲड. जमिल देशपांडे, मनविसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, जिल्हा संघटक राजेंद्र निकम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा: नंदुरबारमध्ये शेती,अवजारे विक्री दुकानात आढळल्या २० तलवारी


मनसेने याबाबत आयुक्तांना आज पुन्हा निवेदन दिले. मनपाकडे निधी नसल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात अन्य ठेकेदारांची बिले अदा केली जात आहेत. जर महापालिकेकडे निधी नाही तर आपण कार्यालयातच का येतात? आपल्या वाहन व अन्य बाबींवर कसा खर्च होतो? असे प्रश्‍न या निवेदनातून उपस्थित केले आहेत. शहरातील रस्त्यांची कामे ज्या संबंधित ठेकेदार/ इंजिनिअर्स यांना दिलेले असले त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क करून द्यावा अथवा त्यांचा मोबाईल नंबर द्यावा म्हणजे आम्हा आता त्यांनाच याबाबत जाब विचारणार आहोत. शहरातील संपूर्ण रस्त्यांच्या कामांना १० दिवसांत करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

loading image
go to top