esakal | जळगावातील धार्मिक स्थळे गुरूवारपासून सुरू होणार!असे आहेत नियम..
sakal

बोलून बातमी शोधा

Padmalay Tempal

जळगावातील धार्मिक स्थळे गुरूवारपासून सुरू होणार!असे आहेत नियम..

sakal_logo
By
देविदास वाणीजळगाव ः जिल्ह्यात धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे (Religious places) येत्या गुरुवारपासून (ता.७) सुरू करण्यात येणार आहे. मात्र त्यात मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, थर्मल स्कॅनिंग व हात धुणे किंवा निर्जुंतुकीकरण (Corona security) करणे या नियमांचे व सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिली.

हेही वाचा: पांढऱ्या सोन्याला भाद्रपदेची ऊब..!

प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणारे व्यक्ती/संस्था/संघटना यांनी याठिकाणी भेट देणारे नागरिक व काम करणारे कामगार यांनी कोविडची लागण होऊ नये अथवा प्रसार होऊ नये याकरीता दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत.


..यांना असेल प्रवेश बंदी
* ६५ वर्षा वरील नागरिक
* कोमार्बिड लक्षणे असलेले व्यक्ती
* गर्भवती महिला, १० वर्षाआतील मुले

हेही वाचा: शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गुगलीने सावद्यात चर्चेला ऊत

असे आहेत नियम..
* गर्दी होऊ नये याकरीता कमीत कमी ६ फुट अंतर ठेवावे
* चेहऱ्यावर मास्कचा वापर आवश्‍यक
* साबणाने वारंवार हात धुवावेत
* खोकतांना, शिंकतांना तोंड, नाक झाकावे
* आरोग्याबाबत निरीक्षण करावे
* थुंकण्यास बंदी राहील
* नियमांचे उल्लघंन कराल तर दंड भरावा लागेल
* प्रवेशाव्दारावर हात धुण्याची व्यवस्था असावी
* थर्मल स्क्रिनींग करण्यात यावे
* लक्षणे नसलेल्या व्यक्तीनाच प्रवेश द्यावा
* भावीकांना थांबण्याची वेळ निश्‍चीत करावी
* दर्शनासाठी रांगेत उभे करावे
* मुर्ती, पुतळा, पुस्तके यांच्या स्पर्शास प्रतिबंध
* रेकॉर्डींग केलेले भक्तीपर गाणे वाजवावे
* वादक, गायक गटास प्रतिबंध
* प्रसाद वाटप, पवित्र पाणी शिंपडण्यास बंदी

हेही वाचा: धुळ्यात रोजचा २०० टन कचरा जागच्या जागी पडून

कोविड संशयीत आढळल्यास
अशा व्यक्तीस एका स्वतंत्र खोलीमध्ये किंवा परिसरात इतर लोकांपासून विलगीकरण करावे. अशा व्यक्तीस वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पडताळणी होईपावेतो चेहऱ्यावर मास्क परिधान करणे आवश्यक राहील, अशा रुग्णाची माहिती तात्काळ जवळच्या कोविड केअर सेंटर/रुग्णालयास द्यावी.

loading image
go to top