शासकीय हमीभाव केंद्रावर बाजरीची खरेदी करावी; मुख्यमंत्र्यांकडे मागणी ! 

शासकीय हमीभाव केंद्रावर बाजरीची खरेदी करावी; मुख्यमंत्र्यांकडे मागणी ! 

पारोळा ः राज्यात रब्बी हंगामात बाजरी पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे बाजरी पिकाचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती चांगल्या आले आहे. मात्र खुल्या बाजारात व्यापारी "कोरोना' चे कारणे दाखवुन शेतकऱ्यांची बाजरी कवडीमोल भावात खरेदी करीत आहे. ज्या प्रमाणे शासनामार्फत ज्वारी, मका, हरभरा, तुर सोयाबीन खरेदी केला जातो. त्याचप्रमाणे शासकीय खरेदी केंद्रावर बाजरी देखील खरेदी केली जावी अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्मंत्र्याकडे केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

कासोदा रोड जवळील शासकीय मका,ज्वारी खरेदी केंद्राच्या काटापुजन प्रसंगी ते बोलत होते. 
प्रत्येक तालुक्‍यात शासकीय मका व ज्वारी खरेदी केंद्रे सुरू व्हावीत अशी मागणी आ.चिमणराव पाटील यांनी शासनाकडे लावुन धरली होती.त्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यात शेतकरी सहकारी संघात शासकीय मका,ज्वारी खरेदीला परवानगी मिळाली होती.त्यानुसार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्या अनुषंगाने आज आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते शेतकरी सुभाष पाटील यांची ज्वारी खरेदी करुण खरेदी केंद्राचा शुभारंभ केला. 

कार्यक्रमात पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की,सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे नागरिकांसह शेतकरी अडचणी सापडला आहे.अशा कठीण परिस्थितीचा सामना शासन व प्रशासन करीत असुन नागरिकांनी नियमांचे पालन करावे. तसेच तालुक्‍यातील शेतकरी हा आपला माल विक्रीपासून वंचित राहणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशा सुचना केल्या. यावेळी तहसीलदार अनिल गवांदे, शेतकरी संघ चेअरमन डॉ. राजेंद्र पाटील, व्हाईस चेअरमन भिकन महाजन, पंचायत समिती सभापती रेखा भिल, बी डी ओ मंजुश्री गायकवाड, जि. प. सदस्य डॉ. हर्षल माने, सेना तालुका प्रमुख प्रा. आर. बी. पाटील, शहर प्रमुख अशोक मराठे कृ ऊ बा उपसभापती डॉ. पी. के. पाटील, मधुकर पाटील, पं. स. सदस्य जितेंद्र पाटील, प्रमोद जाधव, शेतकरी संघ संचालक सखाराम चौधरी, चेतन पाटील, नाना श्रावण पाटील, दाजभाऊ पाटील, विस्तार अधिकारी सुनील पाटील, चतुर भाऊसाहेब पाटील, जिजाबराव पाटील, राजेंद्र कासार, कृ ऊ बा सचिव रमेश चौधरी, शेतकरी संघ सचिव भरत पाटील, शंतनू पाटील उपस्थित होते. 
शासकीय खरेदी केंद्रात ज्वारीस 2550 तर मक्‍यास 1760 इतका भाव देण्यात येणार आहे. यावेळी तालुक्‍यातील 1500 शेतकऱ्यांनी ऑफलाईन नोंदणी केली आहे. यात ऑनलाइन ज्वारी नोंदणी 223 तर मका 334 शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. एक दोन दिवसात बारदान उपलब्ध झाल्यावर खरेदीस गती येणार असल्याने शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले. 

व्यापारी शेतकऱ्यांची करताय फसवणूक 
रब्बी हंगामात बाजरी पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे बाजरी पिकाचे चांगले उत्पादन शेतकऱ्यांचा हाती आले आहे. परंतु खुल्या बाजारात व्यापारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खोट्या नाट्य अडचणी सांगून कवडीमोल भावाने बाजरीची खरेदी करीत आहे. त्यामुळे निसर्गाचा खरीब हंगामातील आसमानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होवू नये, शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या ज्वारी, मका, हरबरा, तूर, सोयाबीन या धान्याबरोबरच बाजरी धान्याची देखील हमीभावाने खरेदी सुरू करणेबाबत तत्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व संबंधितांना योग्य ते आदेश निर्गमित व्हावेत अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री सह कृषी मंत्री, सहकार व पणन मंत्री यांच्याकडे केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com