जळगावः जिल्हा रुग्णालयात परिचारिकांच्या कामबंद आंदोलन मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ICU room

जळगावः जिल्हा रुग्णालयात परिचारिकांच्या कामबंद आंदोलन मागे

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव ः अहमदनगर येथील आयसीयू कक्ष (ICU room) जळीत प्रकरणी दोषी नसताना तेथील परिचारिका, डॉक्टरांना (Doctor) अटक करण्यात आली आहे. त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. ते मागे घेण्यात यावे, त्यांची अटकेतून तत्काळ सुटका करण्यात यावी, यासाठी काल सोमवारी (ता. १५) जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे पाचशे परिचारिका, डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते. आज ते आंदोलन (Movement) मागे घेण्यात आले आहे. कामबंद आंदोलनाने ‘ओपीडी’त येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्यात अडचणी आल्या होत्या.दाखल रुग्णांवरही शिकावू नर्सेसकडून काम करवून घेतले जात असल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा उडल्याचे चित्र जिल्हा रुग्णालयात (District Hospital) पाहावयास मिळाले होते.

हेही वाचा: जळगावःमंजूर निधी १३५ कोटी..खर्च केवळ २४ कोटी

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात ६ नोव्हेंबरला अतिदक्षता विभागात आग लागून ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणाची चौकशी न करता कार्यरत वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिका यांना अटक करण्यात आली. या कारवाईचा वैद्यकीय अधिकारी व परिचारिका संघटनेतर्फे तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. शनिवारी (ता. १३) येथील जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकांनी काळ्या फिती लावून निदर्शने करीत कामकाज केले होते. तरीही न्याय न मिळाल्यास सोमवारपासून कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार कालपासून कामबंद आंदोलन करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमधील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यात सहभागी झाल्या होत्या. अध्यक्षा सुरेखा लष्करे, उपाध्यक्षा माया सोलंकी, जयश्री जोगी, डॉ. संदीपकुमार पाटील आदींनी यात सहभाग घेतला. जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, आरोग्य केंद्र यातील सर्वच जण आंदोलनात सहभागी झाले आहेत.


सर्व डॉक्टर, नर्सेस संघटनांची सीएस डॉ. एन. एस. चव्हाण, अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी बैठक घेऊन त्यांच्या मागण्या आरोग्य संचालकांना कळविण्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलकांनी कामबंद आंदोलन मागे घेण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र रात्री उशिराबाबत कामबंद आंदोलन सुरूच होते.अहमदनगर येथील घटनेप्रकरणी परिचारिका, डॉक्टरांवर कारवाई अयोग्य आहे. मात्र रुग्णांना वेठीस धरून त्यांचे हाल करणेही योग्य नाही. आरोग्य सेवेचे व्रत घेतले असताना रुग्णांना सेवा न दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. परिचारिकांच्या मागण्या आरोग्य संचालकांपर्यंत पोचविण्याचे आश्‍वासन आम्ही दिले. यामुळे कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
-डॉ. एन. एस. चव्हाण,
जिल्हा शल्यचिकित्सक

हेही वाचा: शिरपूर: लुटीच्या गुन्ह्यात ब्लेडपत्ती गँग चार तासांत जेरबंद

आंदोलन मागे
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या मेट्रन प्रणिता गायकवाड म्हणाल्या, की आमचे कामबंद आंदोलन सुरूच आहे. रुग्णसेवा कोलमंडणार नाही याची आम्ही दक्षता घेतली आहे. ज्या नर्सेस संपात सहभागी नाहीत त्यांना कामावर येण्यास सांगितले आहे. आमच्या संघटनेच्या वरिष्ठांशी बोलणे झाल्यानंतर कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे. रुग्णांना आता सेवा दिल्या जात आहे.

loading image
go to top