गावच्या मतदार यादीत पुणे, मुंबईतील नावे 

देविदास वाणी
Friday, 11 December 2020

भादली बुद्रूक ग्रामपंचायतीची पारूप मतदार यादी जाहीर झाली. त्यात वॉर्ड क्रमांक पाच मध्ये मुंबई, पुणे, जळगाव, भुसावळ येथील मतदारांची नावे आहेत. या निवडणूकीत ग्रामीण भागात मतदारांची नावे आहेत.

जळगाव : भादली ग्रामपंचायतीच्या मतदार याद्यांमध्ये तब्बल ८०० ते १००० नावे बोगस आहेत. त्यात मुंबई, पुणे, भुसावळ, जळगाव येथील मतदारांची नावे असल्याचे तक्रारी भादली बुद्रूक येथील ग्रामस्थ राजेंद्र चौधरी, गोपाळ ढाके, गलू ठोसर, छगन खडसे व नागरिकांनी तालुका निर्णय अधिकारी तथा तहसिलदार नामदेव पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. 

नक्‍की वाचा- उत्तर महाराष्ट्रात भाजपला बसणार आणखी मोठा झटका ? वाढदिवसाच्या जाहिरातीतून दिले नेत्याने संकेत

भादली बुद्रूक ग्रामपंचायतीची पारूप मतदार यादी जाहीर झाली. त्यात वॉर्ड क्रमांक पाच मध्ये मुंबई, पुणे, जळगाव, भुसावळ येथील मतदारांची नावे आहेत. या निवडणूकीत ग्रामीण भागात मतदारांची नावे आहेत. एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यात एका गावातून दुसऱ्या गावात तसेच खेड्यातील रहिवाशांचे महानगरात व महानगरातील नावे खेड्यात परत नोंदविण्यात आली आहेत. बीएलओंनी दुबार नावे वगळण्याबाबत संबंधित मतदारांना नोटीशी देण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे. दोन ते तीन पंचवार्षिक निवडणूकापासून मतदारांची दुबार नावे आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बीएलओंना आदेश देवुन दुबार नावे वगळावी. अशी मागणी आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bhadli gram panchayat voter list name double