
बाजार समितीत विविध धान्याचे व्यापारी, गुळाचे व्यापारी, धान्याचे व्यापारी यांची दुकाने आहेत. शेतकऱ्यांचा माल रोज येथे येवून त्याची विक्री होती. ती पूर्णपणे आज बंदी होती.
जळगाव : भारत बंदमध्ये आज कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड बंद होते. मार्केट समितीचे गेटच आज उघडले नाही. यामुळे ना व्यापाऱ्यांना दुकाने सुरू करता आली ना बाजार समितीत व्यवहार करता आले. बंद मुळे सुमारे सहा कोटींची उलाढाल आज ठप्प होती.
बाजार समितीत विविध धान्याचे व्यापारी, गुळाचे व्यापारी, धान्याचे व्यापारी यांची दुकाने आहेत. शेतकऱ्यांचा माल रोज येथे येवून त्याची विक्री होती. ती पूर्णपणे आज बंदी होती. बाजार समितीत सुमारे सव्वाशे ते दीडशे दुकाने आहेत व बाजार समिती अशी एकत्रीत रोज सहा लाखांची उलाढाल होत असल्याची माहिती व्यापारी संजय शाह यांनी दिली.
धरणगावमध्ये कडकडीत बंद
धरणगाव : शहरात शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’च्या आवाहनाला सर्वांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत कडकडीत बंद पाळण्यात आला. शेतकरी संघटनेसह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन केले होते.
वरणगावला आठवडे बाजार बंद
वरणगाव : शहरात महाविकास आघाडीच्या आवाहनाला प्रतिसाद देत शंभर टक्के बंद पाळण्यात आला. शहरात आठवडे बाजार असताना बंद ठेवण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी शहरात फिरून दुकानदारांना बंदचे आवाहन केले होते. या वेळी कार्यकर्त्यांनी कृषी कायद्याविरोधात घोषणाबाजी केली. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान महाजन, जिल्हा संघटक विलास मुळे, शहराध्यक्ष रवी सुतार, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष संतोष माळी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अश्फाक काझी, मनोज देशमुख, उपाध्यक्ष प्रकाश भैसे आदी उपस्थित होते.
संपादन ः राजेश सोनवणे