बीएचआर घोटाळा; ठेवींच्या पावत्या मॅचिंगद्वारे कर्जफेडीचा संशय

दुसऱ्या सत्रातील अटकसत्राने राजकीय व व्यावसायिक वर्तुळाची झोप उडवली आहे.
बीएचआर घोटाळा; ठेवींच्या पावत्या मॅचिंगद्वारे कर्जफेडीचा संशय



जळगाव : बीएचआरमधील (BHR) अवसायक नियुक्तीनंतरच्या कोट्यवधींच्या गैरव्यवहारात (Scam) गुरुवारी ज्यांना अटक झाली, त्यांनी कोटींचे कर्ज ठेवींच्या पावत्या (Receipts of loan deposits) मॅचिंगद्वारे किरकोळ रक्कम परतावा करून ‘नील’ केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
( bhr scam doubt receipts of loan deposits)

बीएचआर घोटाळा; ठेवींच्या पावत्या मॅचिंगद्वारे कर्जफेडीचा संशय
आगामी निवडणुका स्वबळावर लढणार : आमदार गिरीष महाजन

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर प्रारंभिक अटकसत्र पार पडले. आता दुसरी लाट ओसरत नाही, तोच दुसऱ्या सत्रातील अटकसत्राने राजकीय व व्यावसायिक वर्तुळाची झोप उडवली आहे.


अशी झाली कारवाई
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जळगावचे जनजीवन पूर्ववत होऊन व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी नव्या उमेदीने कामाला लागले होते. मात्र, गुरुवारी (ता. १७) अचानक सकाळी सहाला खानदेश सेंट्रलच्या हिरवळीवर निवांत मॉर्निंग वॉक करताना संजय तोतला यांना पथकाने वॉरंटचा कागद दाखवत गाडीत बसवून घेतले. दुसऱ्या एका पथकाने हॉटेल व्यावसायिक भागवत भंगाळे, जयश्री मणियार यांना ताब्यात घेतले. पाठोपाठ अन्य संशयितांना त्या-त्या ठिकाणाहून अन्य पथकांनी ताब्यात घेण्याचे सोपस्कार पार पाडले.


बीएचआर घोटाळा; ठेवींच्या पावत्या मॅचिंगद्वारे कर्जफेडीचा संशय
भुसावळात रेल्वे वॅगनमधून डिझेलची चोरी

पहिल्या टप्प्यातील अटक
जळगावच्या तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्याकडे या गुन्ह्यांचा तपास असून, गेल्या वर्षी कंडारे, सुनील झंवर वगळता सीए महावीर जैन, विवेक ठाकरे, सूरज झंवर, धरम सांखला आदींसह अटक झाली होती. या प्रकरणात नुकतीच धरम सांखला आणि त्या अगोदर सुनील झवर याचा मुलगा सूरज याची जामिनावर सुटका झाली. परिणामी काही संशयितांनी सुटकेचा निःश्वास सोडलेला असतानाच ही कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.


घरांचीही झाडाझडती
भागवत भंगाळे, संजय तोतला, जयश्री मनियार यांना ताब्यात घेत त्यांच्या कुटुंबीयांना अटकेची नोटीस देत लगेच जिल्‍हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करुन अटकेची नोंद करण्यात आली. संशयितांना अटक करताच प्रत्येकाच्या निवासस्थावर पुण्याच्या पोलिस पथकाने झडतीसत्र राबवले. भंगाळे यांच्या गांधीनगर निवास्थानावर साडेपाच तास पथकाने घराची झडती घेत आवश्यक दस्तऐवज ताब्यात घेतले. अटकेतील प्रत्येकाच्याच घरावर स्वतंत्र पथकातर्फे झाडाझडती होत असताना नातेवाईक परिचितांची सकाळीच झोप उडाली.


आमदार, निकटवर्ती भेटीला
आमदार सुरेश भोळे, शिवसेना जिल्‍हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह परिचितांनी चौकशीसाठी धाव घेतली. मात्र, पथकाने आमदारांसह इतरांना कायदेशीर सल्ला देत सर्व समाधान करून रवाना केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com