Girish Mahajan-Eknath Khadse
Girish Mahajan-Eknath Khadse

गिरीश महाजनांनी खडसेंना दिले आव्हान..तुमची सीडी दाखवाचं

Jalgaon Political News : सीडी पोलिस चौकशी करण्यासाठी दिली आहे. त्याची लवकर चौकशी करून ती बाहेर काढावी.
Published on



जळगाव ः ईडी लावली तर सीडी लावू असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे (NCP leader Eknath Khadse) विधान होते. दोन दिवसापूर्वी खडसेंनी पत्रकार परिषदेत त्या सीडीची (CD) चौकशी सुरू असून ती योग्य वेळी लावू असे सांगितले होते. यावर भाजपचे नेते गिरीश महाजन (BJP leader Girish Mahajan)यांनी खडसेंचे नाव न घेता आमची ईडी (ED) लागली, आता तुमची सीडी दाखवा, असे आव्हान महाजन यांनी खडसेंना आव्हान दिले आहे.

 Girish Mahajan-Eknath Khadse
मंदिरे उघडण्याबाबत सरकारचे आडमुठे धोरण- गिरीश महाजन


येथे सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, की आमची ईडी लागली, आता त्यांनी सीडी दाखवावी. ही सीडी पोलिस चौकशी करण्यासाठी दिली आहे. त्याची लवकर चौकशी करून ती बाहेर काढावी, तसेच याबाबत त्यांनाच विचारा, असे आव्हानही त्यांनी प्रत्यक्ष नाव न घेता श्री. खडसे यांना दिले.

 Girish Mahajan-Eknath Khadse
पितापुत्रास नडली स्टंटबाजी..हातात रायफल आणि तलवार



...तर आम्ही मंदिरे उघडू
राज्यातील मंदिरे सरकारने त्वरित उघडावीत, असे आवाहन करून श्री. महाजन म्हणाले, की सध्या केवळ राज्यातील मंदिरेच बंद आहेत. सोमवारी मंदिरे उघडण्यासाठी आम्ही घंटानाद केला. याबाबत शासनाने त्वरित निर्णय घेतला नाही, तर आम्ही स्वतः मंदिरे उघडू, असा इशारा त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com