मध्यप्रदेशातील भाजपच्या विजयामागे खानदेशी मॅनेजमेंट ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्यप्रदेशातील भाजपच्या विजयामागे खानदेशी मॅनेजमेंट !

डॉ. फडके यांनी पहिल्या दोन दिवसात मतदारसंघाच्या परिस्थितीचा आढावा घेतला घेतला. भौगौलिकदृष्ट्या मतदारसंघाचे पाच भाग करण्यात आले.

मध्यप्रदेशातील भाजपच्या विजयामागे खानदेशी मॅनेजमेंट !

रावेर: मध्यप्रदेशात विधानसभेच्या २७ मतदारसंघांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने विशेष यश मिळवत १९ जागा जिंकल्या. जळगाव जिल्ह्याला लागून असलेल्या नेपानगर मतदारसंघात भाजप उमेदवार सुमित्रा कासडेकर यांनी २६ हजार मतांची आघाडी घेत विजय मिळविला. यात निवडणुकीचे समन्वयक म्हणून डॉ. राजेंद्र फडके यांचे सूक्ष्म नियोजन महत्त्वपूर्ण ठरले. 

वाचा- केळी पीकविमाप्रश्‍नी खासदार निष्क्रिय; आमदारांवर आरोप का ?

२०१८च्या विधानसभा निवडणुकीत श्रीमती कासडेकर काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाल्या होत्या. भाजप सरकारला पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला व यावेळी भाजपकडून निवडणूक लढवली. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी केंद्रीय आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश राज्याच्या पक्षनेत्यांनी डॉ. राजेंद्र फडके यांच्याकडे मतदारसंघाचे समन्वयक म्हणून सोपवली होती. दिली. 

निवडणुकीचे मॅनेजमेंट 
कॉंग्रेसमधून भाजपत घेतल्यानंतर त्यांनाच उमेदवारी मिळाल्याने खरेतर भाजपत काही प्रमाणात नाराजी होती. त्यामुळे श्रीमती कासडेकर यांना मोठ्या फरकाने निवडून आणणे एक आव्हानच होते. त्या पाश्‍र्वभूमीवर डॉ. फडके यांनी पहिल्या दोन दिवसात मतदारसंघाच्या परिस्थितीचा आढावा घेतला घेतला. भौगौलिकदृष्ट्या मतदारसंघाचे पाच भाग करण्यात आले. त्यातील नाराज कार्यकर्ते आणि नेते यांच्या त्यांनी व्यक्तिगत भेटी घेतल्या. प्रचार, सभा, मतदान प्रक्रिया याचे नियोजन केले. आणि मतदारसंघ विजयाच्या दिशेने सुरक्षित केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून लढताना १२०० मतांनी निवडून आलेल्या श्रीमती कासडेकर यांनी यावेळी भाजपच्या उमेदवारीवर २६ हजारांचे मताधिक्य घेतले, यावरुन या मतदारसंघातल नियोजन फलदायी ठरल्याचे दिसून येते. 

आवश्य वाचा- डीसीपीएस’धारक शिक्षकांचा राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेत समावेश

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, ज्येष्ठ नेते सुहास भगत, खासदार नंदकुमारसिंह चौहान, माजी मंत्री अर्चना चिटणीस, मंजुश्री दादू यांच्यासह मंडळ प्रमुख, सेक्टर प्रभारी, सर्व बूथ टीम आणि जळगाव जिल्ह्यातून प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचे हे फलित आहे. 
- डॉ. राजेंद्र फडके 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top