esakal | दारू विक्रेत्यांशी वाद..रेल्वेखाली झोकून तरुणाची आत्महत्त्या
sakal

बोलून बातमी शोधा

Suicided

दारू विक्रेत्यांशी वाद..रेल्वेखाली झोकून तरुणाची आत्महत्त्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


जळगाव : आदल्या दिवशी गावात दारू विक्रेत्यांशी वाद (Dispute) होउन त्यांनी आई- वडिलांसह कुटुंबीयांना मारहाण केल्यावरही पाचोरा पोलिसांनी (Police) तक्रार घेतली नाही, गुन्हा नोंदविण्यात बीट हवालदार श्याम पाटीलसह निरीक्षकांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप करीत या वादातूनच स्वतः ला धावत्या रेल्वेसमोर झोकून देणाऱ्या तरुणाचा मृतदेह घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला. त्या पोलिसावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा: अभियंता दिन विशेष:दोन दशकांपूर्वी ठरले‘मेक इन इंडिया’चे पायोनिअर


पाचोरा तालुक्यातील दहीगाव संत येथे दोघांना दारू पिण्यामुळे हटकल्याचा राग आल्याने नऊ ते दहा जणांच्या जमावाने सागर गणेश खडसे (वय २२, रा. दहीगाव संत, ता. पाचोरा) याची आई कल्पना, वडील गणेश खडसे अशांना बेदम मारहाण केल्याची घटना १३ सप्टेंबरला घडली. अवैध धंदेवाईक आणि पोलिसांत वजन असलेल्या शेजवळ कुटुंबीयांकडून मारहाण होत असताना गावातील एकही व्यक्तीने भांडण सोडवले नाही. मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात सागरच्या आईने पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मात्र हा गुन्हा नोंदवताना पोलिसांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप सागरच्या आई कल्पना खडसे यांनी केला. कल्पना यांच्या म्हणण्यानुसार मारहाण करणारे जवळपास दहा लोक असताना पोलिसांनी फक्त ४- ५ आरोपींची नावे तक्रारीत घेत गुन्हा दाखल केला.

पोलिस ठाण्याबाहेरच अडवणूक

गुन्हा नोंदविण्यासाठी खडसे कुटुंबीय पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर बीट अंमलदार शाम पाटील याने आत जाऊच दिले नसल्याचा आरोप होत आहे. तक्रारदारांना धक्काबुक्की करुन बाहेरून हाकलून लावले होते. म्हणून डीवायएसपी कार्यालय गाठून तक्रार केली. पोलिसांकडून न्याय मिळणार नाही. भांडणानंतर शेजवळ कुटुंबीय गावात सुखाने जगू देणार नाही. या विचाराने खचून सागरने मंगळवारी सर्वांदेखत धावत्या रेल्वेसमोर स्वतः ला झोकून दिल्याचे सागरच्या आई, बहीण आणि भाऊने माहिती देताना सांगीतले.

हेही वाचा: रोजगार सेवकांच्या मागणीला 'लिंबुपाण्या'चा गोडवा


त्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा..

सागराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हवालदार श्याम पाटील आणि संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा कल्पना यांच्यासह कुटुंबीयांनी घेतला. मयताच्या नातेवाईकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

loading image
go to top