मंत्री यशोमती ठाकूर यांचा भाजप महिला आघाडीने केला निषेध

भूषण श्रीखंडे
Friday, 27 November 2020

राज्यातील महिलांवरील वाढलेल्या अत्याचाराबाबत निवेदन देणार होते. परंतू मंत्री ठाकूर यांनी भाजप आघाडीची भेट नाकारल्याने भाजप आघाडीच्या पदाधिकारी व कार्यक्रत्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध केला.   

 जळगाव ः राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर या जळगाव जिल्हाच्या दौऱयावर आहे. जिल्हा परिषदेत बैठकी सुरू होण्यापुर्वी भाजप महिला आघाडीने मंत्री सौ. ठाकुर यांना निवेदन दिले असता त्यांनी ते स्विकारले नाही. त्यामुळे त्यांच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा भाजप महिला आघाडीने जोरदार निषेध करून जिल्हा परिषदेत आंदोलन केले. 

आवश्य वाचा- जळगावातील बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकावर आर्थिक गुन्हे शाखेची धाड 
 

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱयावर आल्या. जिल्हा परिषेदेत त्या महिला व बालकल्याण विभागाचा आढावा बैठक घेणार होत्या. बैठकीपूर्वी भाजपचे महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक उज्वला बेंडाळे, जळगाव जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष दिप्ती चिरमाडे,  महापौर भारती सोनवणे, दिप्ती चिरमाडे, मनपा महिला व बालकल्याण समिती सभापती रंजना सपकाळे, नगरसेविका अॅड. शुचिता हाडा, मिनाक्षी पाटील, लता बाविस्कर, सरोज पाठक, सुरेखा अमृतकार यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी  व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी मंत्री ठाकूर यांची आगमाना दरम्यान भेट घेवून राज्यातील महिलांवरील वाढलेल्या अत्याचाराबाबत निवेदन देणार होते.  परंतू मंत्री ठाकूर यांनी भाजप आघाडीची भेट नाकारल्याने भाजप आघाडीच्या पदाधिकारी व कार्यक्रत्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निशेध केला.   

पोलिसांनी भाजपच्या पदाधिकाऱयांना रोखले
भाजपच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱयांची भेट नाकारून बैठकीला मंत्री ठाकूर निघून गेल्यावर महिला पदाधिकारी बैठकी दरम्यान भेटण्यासाठी जाणार तोच पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावरच अडवले.  त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱयांनी सरकार विरोधी तसेच निवेदन न स्विकारता पळपुटेपणा केल्याचा आरोप करीत जोरदार घोषणाबाजी यावेळी केली. त्यामुळे काहीवेळासाठी जिल्हा परिषदेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. 

आवश्य वाचा- २६/११ हल्यातील हिंगोण्याचे शहीद जवानाचा राजकीय पदधिकारींना पडला विसर
 

आम्ही शांततेचा मार्गाने महिलांवरील वाढलेल्या अत्याचार बाबता मंत्री यशोमती ठाकूर यांना निवेदन द्यायचे होते.  त्या महिला मंत्री असून त्यांनी महिलांच्या समस्याबाबत पळकुटे पणा केला. त्यामुळे त्यांचा नाकारते पणा यातून दिसून येत याबाबत आम्ही निषेध करत तेथे आंदोलन केले.  
 उज्वला बेंडाळे- भाजप महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon BJP Women's Front protests against Minister Yashomati Thakur