BREAKING NEWS: फडणवीस यांच्या ताफ्यातील कारला नशिराबादजवळ अपघात !

BREAKING NEWS: फडणवीस यांच्या ताफ्यातील कारला नशिराबादजवळ अपघात !

जळगाव : माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी जिल्हा दौऱ्यावर आले असता ते स्वर्गीय माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्या भालोद येथील निवासस्थानी जात असताना नशिराबाद टोलनाक्याजवळ त्यांच्या ताफ्यातील वाहनाला किरकोळ अपघात झाला. या अपघातात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर किरकोळ जखमी झाले आहेत. 

विरोधी पक्षनेते फडणवीस व माजी मंत्री गिरीश महाजन हे एकाच कारमधून जात होते. तर त्यांच्या वाहनांच्या ताफ्यातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचीही कार होती. दरम्यान, रात्री नऊच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू होता. पावसाचा अंदाज न आल्याने दरेकर यांच्या कारच्या चालकाने अचानक ब्रेक दाबला. यावेळी कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उतरली. या अपघातात दरेकर यांना किरकोळ दुखापत झाली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त कारची तपासणी केली. तसेच पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली. तत्पूर्वी ताफा पुढे रवाना झाला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com