esakal | कृषी मंत्री दादा भुसेंनी चाळिसगाव अतिवृष्टी भागाची केली पाहणी
sakal

बोलून बातमी शोधा

Agriculture Minister Dada Bhuse Inspection of damaged area

कृषी मंत्री दादा भुसेंनी चाळिसगाव अतिवृष्टी भागाची केली पाहणी

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात चाळिसगाव व जामनेर तालुक्यात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली. यामध्ये शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान (Damage) झाले. त्यात अनेक शेतजमीन वाहून गेल्या. या पार्श्वभूमीवर आज नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी नुकसान ग्रस्त चाळीसगाव तालुक्यातील भागाची सकाळी पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसान झालेले ठिकाणांचे तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे सुचना अधिकाऱ्यांना दिल्या तसेच सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असून त्यांना तातडीने मदत देण्याचा आश्वासन यावेळी दिले.

हेही वाचा: गिरणा नदीतून भडगाव शहरासाठी ३.२९ दलघमी पाणीसाठा आरक्षित

जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात चाळीसगावमध्ये झालेल्या अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यात नदी, नाल्यांच्या काठावरील जमिनी खरडून गेल्या आहे. त्यामुळे शेतातील पिके पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. याबाबत आज राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी चाळीसगाव तालुक्यातील नुकसान ग्रस्त गावांमधील शेतात जावून पाहणी केली. यावेळी आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण व अधिकारी वर्ग उपस्थित होते.

पंचनामे तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना

यावेळी माध्यमांशी बोलतांना मंत्री दादा भुसे म्हणाले, की चाळिसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने नद्यांना व नाल्यांना मोठा पुर आला. त्यामुळे नद्या व नाल्या लगतच्या शेती पुराच्या पाण्यामुळे खरडून निघाल्या व शेतात घुसलेल्या पाण्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच अनेक गावांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने घरांचे व पशुधनांचे देखील नुकसान झाले. या सर्व नुकसानाची तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहे. त्यानुसार त्वरीत मदत शासनाकडून दिली जाणार असे दादा भुसे यांनी सांगितले.

हेही वाचा: विघ्नहर्त्याची मूर्ती घेऊन जाताना पितापुत्रावर विघ्न

आघाडीतील मंत्र्यांनी भेट दिली..पण मदत नाही

अतिवृष्टी भागात आघाडी सरकार मधील मंत्री तसेच विरोधी पक्षातील नेते नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून गेले. मात्र अद्याप शेतकरी व नुकसानग्रस्तापर्यंत नागरिकांपर्यंत मदत मिळालेली नाही. तसेच घोषणा देखील अद्याप झालेली नाही. याचा मुळ कारण पंचनामे संथगतीने सुरू असल्याचे आरोप कृषी मंत्र्याकडे गावकऱ्यांनी केले आहे.

loading image
go to top