esakal | चाळीसगावच्या पूरग्रस्तांना पहिली मदत खाकीची..!
sakal

बोलून बातमी शोधा

Help

चाळीसगावच्या पूरग्रस्तांना पहिली मदत खाकीची..!

sakal_logo
By
रईस शेख

जळगाव ः चाळीसगाव तालुक्यात आलेल्या आपत्तीजन्य परिस्थितीत अनेकांकडून अन्न, वस्त्र, निवारा हिरावून गेला आहे. गावची गावे स्थलांतरित करण्यात आली असून, एनडीआरएफची पथके (NDRF squads) कामाला लागली आहेत. पूरग्रस्तांसाठी (Flood victims) पहिली मदत जळगाव पोलिस (Jalgaon Police) दलातर्फे बुधवारी दुपारी तातडीने रवाना करण्यात आली.

हेही वाचा: कोकणच्या धर्तीवर जळगावच्या अतीवृष्टी बाधितांना मदत करा-खासदार पाटील


पोलिस अधीक्षक कार्यालयासह विविध पोलिस ठाण्यांतून आवश्यक साहित्य गोळा करण्याच्या सूचना सकाळपासून देण्यात आलेल्या होत्या. उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोलापुरी चादरी, पिण्याचे शुद्ध पाणी, गुलकोज बिस्किटे, चिवड्यांची पाकिटे, फूड पॅकेट्स‌ अशी सामग्री एकत्रित करून जबाबदार कर्मचाऱ्यांसह चाळीसगाव पूरग्रस्तांसाठी पाठविली आहे.

हेही वाचा: ब्रेकिंगः जळगाव जिल्ह्यातील धरणांमध्ये ६ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला

पोलीस अधीक्षक कार्यालयातून मदत रवाना

सहाय्यक पेालिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या हस्ते मदत साहित्य घेऊन जाणाऱ्या वाहनाला हिरवी झेंडा दाखवत पोलिस अधीक्षक कार्यालयातून रवाना करण्यात आले. या वेळी विविध पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

loading image
go to top