
जळगावात धाडसी चोरी..चोरट्यांनी तिजोरीच उचलून नेली
जळगाव ः जळगाव शहरात दिवसेंदिवस चोरी (Theft), घरफोडीच्या घटना वाढत असून आज चक्क जळगाव शहराच्या मध्यवर्तीचे बाजारपेठेच्या (Market premises) ठिकाणी चोरट्यांनी पहाटे चार वाजता धाडसी चोरी केली. जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या (Jalgaon District Agricultural Industrial All Services Co-operative Society) कार्यालयात चोरट्यांनी (Thief) प्रवेश करून तिजोरी चोरून (Locker stole) नेल्याची घटना घडली. या घटनेमूळे जळगाव शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण (Merchant fears) निर्माण झाले आहे. पोलिसांना याबाबात सिसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) मिळाले असून चोरांच्या शोधात पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. तसेच शहर पोलिस ठाण्यात (City Police Station) याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (jalgaon city agricultural society office thief locker stole)
जळगाव शहरातील विसनजी नगरातील जळगाव कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेत आज पहाटे चार वाजता चार चोरांनी प्रवेश केला. चोरांनी तोडाला रूमाल बांधलेले होते. त्यांनी मुख्य दरवाजाचे लॉक तोडून प्रवेश केला. तसेच कार्यालयातील सिसिटीव्हीचे देखील चोरांनी तोडले. डिव्हीआर बॉक्सचे देखील नुकसान केले. तिजोरी उघडण्याचा प्रयत्न चोरांनी केला परंतू तिजोरी उघडता येत नसल्याने चोरांनी तिजोरी सरकवत ती बाहेर आणून ती गाडीत टाकून चोरून नेली. सकाळी कार्यालयात कर्मचारी आले असता त्यांना दरवाजाचे लॉक तुटलेले आढळून आले. त्यांनी त्वरीत आत जावून पाहता तिजोरी नसल्याचे वरिष्टांना कळवील्यानंतर घटना उघडकीस आली.
पोलिसांची तत्काळ धाव
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी येवून पाहणी केली. तसेच पोलिस अधिक्षक प्रविण मुंढे देखील यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. तसेच चौकशी बाबत पोलिस अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. कार्यालय व परिसरातील अकरा सिसिटीव्हीचे फुटेज पोलिसांना मिळाले असून त्या द्वारे पोलिस तपासकरत आहे.

Theft
सहा महिन्यापूर्वी देखील चोरी
याच कार्यालयात सहा महिन्यापुर्वी देखील चोरी झाली होती. त्यावेळी अडिच हजार रुपये चोरट्यांना मिळाले होते. आज मात्र चोरट्यांना मोठा हात मारत तब्बल अडिच लाख रुपये असलेली तिजोरी चोरट्यांनी पळवली आहे.
व्यापाऱ्यांमध्ये भिती..
विसनजीनगरात अनेक वस्तूंच्या एंजन्सी असून तसेच गोडाऊन आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार येथून चालत असतो. भर बाजारपेठेत चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याने जळगाव शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.