जळगाव शहरात पुन्हा मोठा जुगार अड्डा पोलिसांनी केला उध्वस्त 

रईस शेख
Tuesday, 15 December 2020

नवीपेठेतील जिल्हा परिषद चौकाजवळील जूनी बॉम्बे लॉजिंगच्या तळमजल्यावरील एका बंद खोलीत जुगाराचा अड्डा सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली.

जळगाव : शहरातील नवीपेठमधील जिल्हा परिषद चौकाजवळील बॉम्बे हॉटेलच्या तळमजल्यात सुरु असलेल्या जुगाराच्या अड्डयावर छापा पडला. सहाय्यक पेालिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी सलग तीसऱ्यांदा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून १९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. रोकडसह जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख १० हजार ९४६ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. 

आवश्य वाचा- अपहरणाचा संशय अन्‌ चिमुरड्याचा मृतदेह विहिरीत
 

पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना नवीपेठेतील जिल्हा परिषद चौकाजवळील जूनी बॉम्बे लॉजिंगच्या तळमजल्यावरील एका बंद खोलीत जुगाराचा अड्डा सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक नितीन गणपुरे, निरिक्षक धनंजय येरुळे, सहाय्यक पोलीस 
निरिक्षक रविंद्र बागुल यांच्यासह पथकाने घटनास्थळ गाठून चहूबाजूंनी घेराव टाकून छापा टाकला. 

१९ जणांना घेतले ताब्यात 
या कारवाईत पोलिसांनी विकास रमेश सोनवणे( वय ४५ रा. शनीपेठ), फिरोज गुलाब पटेल (वय ३८ रा. सदाशिव नगर), हेमंत रमेश शेटे (वय २८ कांचननगर), अनिल रामभाऊ छडीकर (वय ५१ रा. शिवाजीनगर), अशोक ओंकार चव्हाण (वय ६२ रा कानळदा रोड के.सीपार्क), घनशाम लक्ष्मणदास कुकरेजा (वय ६१ रा. सिंधी कॉलनी), अनिल भिमराव ढेरे (वय ५२ रा लक्ष्मीनगर), पंढरी ओंकार चव्हाण (वय ५०रा. त्रिभुवन कॉलनी), रायचंद लालचंद जैन (वय ६१ रा. गणपती नगर), रामदास दगडू मोरे (वय ५९ रा. शाहूनगर), नितीन परशुराम सुर्यवंशी (वय ४० रा. हरिओम नगर), नजीर शफी पिंजारी (वय ५० रा. रा. कोळीपेठ), पंकज वामन हळदे (वय १९ रा.चौघुले प्लॉट), आसीफ अहमद खाटीक (वय ४६ रा. पिंप्राळा हुडको ), ब्रिजलाल आनंदराम वालेचा (वय ६८ रा. लक्ष्मीनगर), मोहम्मद सलिम मोहम्मद ईस्माईल (वय ६५ रा. इस्लामपुरा), भवानीपेठ, सलिम खान मुसा खान (वय ५३ रा.शिवाजीनगर), नूरा गुलाम पटेल (वय ३५ रा. सुरेशदादा जैन नगर) व पवन गुरुदासराम लुल्ला (वय ४२ रा.सिंधी कॉलनी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच टीव्हीचा सेटअप बॉक्स, मोबाईल, दुचाकी, रोकड व जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख १० हजार ९४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश मधुकर पाटील यांच्या फिर्यादीवरुन सर्व १९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक निरिक्षक रविंद्र बागुल हे करीत आहेत. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon city a big gambling police station was destroyed again