esakal | जळगावकर सावधान..चार दिवसांत वाढले कोरोनाचे दहा रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona

जळगावकर सावधान..चार दिवसांत वाढले कोरोनाचे दहा रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात अन्य तालुके व शहरांमध्ये कोरोनाचा (Corona) संसर्ग नियंत्रणात असताना जळगाव शहरात मात्र गेल्या चार दिवसांत दहा नवे रुग्ण आढळून आले असून सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या ५ वरुन १५वर गेली आहे.

हेही वाचा: आईच्या चारित्र्यावर बापाचा संशय..पित्याचा दोघा मुलांकडून खून


जळगाव जिल्ह्यात दुसऱ्या लाटेच्या तीव्रतेनंतर जूनपासून कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येऊ लागला आहे. सलग तीन महिने दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने घटत आहे, त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. असे असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे.


जळगाव शहरात रुग्णवाढ

गेल्या काही दिवसांमधील नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची स्थिती पाहता जिल्ह्यातील अन्य तालुके व शहरांच्या तुलनेत जळगाव शहरात रुग्ण सातत्याने आढळून येत आहेत. त्यामुळे ७ सप्टेंबरला जळगाव शहरात असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या गेल्या चारच दिवसांत वाढून ५ वरुन १५ झाली आहे. म्हणजे ८ ते १२ सप्टेंबरदरम्यान तब्बल १० रुग्ण वाढले आहेत. रविवारी अकराशेवर चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातून ३ नवे रुग्ण समोर आले असून हे तीनही रुग्ण जळगाव शहरातील आहेत. त्यामुळे जळगाव शहरातील सक्रिय रुग्णसंख्या १५ झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरात ४ रुग्ण बरे झाले. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा २४वर आहे.

हेही वाचा: अर्ध्यातून मोडला वीज खांब अन् मृत्यू राहिला दोन हात लांब


चार दिवसांतील रुग्णवाढ अशी
तारीख---- नवे रुग्ण--- जळगावातील----- सक्रिय रुग्ण
९ सप्टेंबर----६-------------४-----------९
१० सप्टेंबर---२-------------२-----------११
११ सप्टेंबर----२-----------२------------१२
१२ सप्टेंबर----३------------३---------१५

loading image
go to top