esakal | जळगाव शहरातील चौपदरीकरणासाठी डिसेंबरची ‘डेडलाइन’
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Highway

जळगाव शहरातील चौपदरीकरणासाठी डिसेंबरची ‘डेडलाइन’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


जळगाव: तीन वर्षांपासून रखडलेल्या शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या (Highway four way work) कामाला आता डिसेंबरची ‘डेडलाइन’ ठरविण्यात आली आहे. या कामाला वेग आला असून, दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे.

हेही वाचा: नंदुरबारःआयान साखर कारखान्याची तिसऱ्या दिवशी चौकशी सुरूच


धुळे- जळगाव महामार्ग पाळधीजवळून बायपास गेल्याने जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विशेष बाब म्हणून शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी निधी मंजूर केला आणि तीन वर्षांपूर्वी या कामास मुहूर्त लागला.


काम रखडले
६९ कोटींच्या या कामाची निविदा जांडू कन्स्ट्रक्शनकडे असून, काम सुरू तर झाले; मात्र ते वेगात होत नसल्याने रखडले आहे. मध्यंतरी मार्चपासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने लॉकडाउन लागले व काम ठप्प झाले. नंतरच्या टप्प्यातही काम वेग घेऊ शकलेले नाही. अलीकडच्या काळात या कामाला वेग आल्याचे दिसत आहे. आतापर्यंत ५०- ६० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे.


डिसेंबरची डेडलाइन
जिल्ह्याच्या ‘दिशा’ समितीची बैठक नुकतीच दोन्ही खासदारांच्या उपस्थितीत झाली. खासदार उन्मेष पाटील यांनी फागणे- तरसोद व शहरातील कामाबाबत जाब विचारला. कामाला चालना देण्याची सूचनाही केली. महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कंत्राटदाराच्या प्रतिनिधींनी काम पूर्ण करण्यासंबंधी माहिती दिली. त्यानुसार आता हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्हा बँक निवडणूक:सुडाच्या कारवाईमुळे आता भाजप वगळून पॅनल


अद्यापही बराच टप्पा बाकी
खोटेनगर ते कालिंकामाता चौक या सात किलोमीटरच्या टप्प्यात हे काम सुरू आहे. त्यासाठी दादावाडी, गुजराल पेट्रोलपंप, अग्रवाल चौक, प्रभात चौकात अंडरपास, तर आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक, अजिंठा चौफुली याठिकाणी रोटरी सर्कल करण्यात येणार आहे. अंडरपासची कामे अंतिम टप्प्यात आहे, तर रोटरी सर्कलची कामे प्रलंबित आहे. त्यामुळे दोन महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे आव्हान आहे.

loading image
go to top