esakal | जळगाव जिल्हा बँक निवडणूक:सुडाच्या कारवाईमुळे आता भाजप वगळून पॅनल
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon District Bank

जळगाव जिल्हा बँक निवडणूक:सुडाच्या कारवाईमुळे आता भाजप वगळून पॅनल

sakal_logo
By
कैलास शिंदे

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांच्यावर ‘ईडी’(ED)ची कारवाई सुरू आहे. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तीकर विभागाचे छापे टाकण्यात आले आहेत. या सूडबुद्धीच्या कारवाईमुळे आता भाजपला (BJP) सोबत न घेतला जिल्हा बँक निवडणूकीत (District Bank Election) राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेस या तीन पक्षाचे महाविकास पॅनल (Mahavikas Panel) करण्यात यावे असा सूर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केला. त्यासंबंधी सर्वपक्षीय बैठक झाल्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: नंदुरबारःआयान साखर कारखान्याची तिसऱ्या दिवशी चौकशी सुरूच


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे. मात्र सहकारात राजकारण नको म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्हाबँक निवडणुकीत भाजपला सोबत घेवून सर्वपक्षीय पॅनल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सर्वपक्षीय कोअर कमेटीही निश्‍चित करण्यात आली आहे. त्याच्याही बैठका घेण्यात आल्या आहेत. आता जागा व उमेदवार ठरविण्यासाठी बाबत बैठक घेण्यात येणार आहे. मात्र आता केंद्रातील भाजप प्रणित सरकारने राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या तीन्ही बहिणींच्या घरावर आयकर छापे टाकले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी पसरली आहे.त्यामुळे जळगाव जिल्हा बँकेच्य सर्वपक्षीय पॅनलमध्येही आता भाजपला सोबत घेवू नये असा सूर राष्टवादी कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये व्यकत होत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक शिरसोली रोडवरील गुलाबराव देवकर कॉलेजमध्ये घेण्यात आली. यावेळी जिल्हध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी प्रदेशाध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, संजय पवार, वाल्मीक पाटील आदी उपस्थित होते. यावेळी काही नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यावर होत असलेल्या कारवाईमुळे भाजपला सर्वपक्षीय पॅनलमध्‌ये भाजपला सोबत घेवून नये असे मत व्यक्त केले. जर राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा परिस्थितीत भाजपसोबत गेल्यास जनतेत चुकीचा संदेश जाईल असे मतही काही नेत्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: कर्नाटक राज्यातील लुट प्रकारणाचे कनेक्शन यावल शहरात


देवकर म्हणाले..
याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची आज बैठक झाली, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेत्यावर केंद्राकडून होत असलेल्या कारवाईमुळे भाजपला जिल्हा बॅक निडणुकीत सोबत घेण्यात अनेकांनी विरोध केला आहे. त्यामुळे आता शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या महाविकास आघाडीच्या पक्षाचेच पॅनल करण्यचा सूर व्यक्त होत आहे. मात्र भाजपसोबत अगोदर पॅनलबाबत दोन बैठका झाल्या आहेत. मात्र, तिसरी बैठक लवकरच होणार आहे. ती बैठक झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या पॅनलचा निर्णय जाहीर करण्यात येईल असेही देवकर यानी सांगितले.

loading image
go to top