esakal | नंदुरबारःआयान साखर कारखान्याची तिसऱ्या दिवशी चौकशी सुरूच
sakal

बोलून बातमी शोधा

Ian Sugar factori

नंदुरबारःआयान साखर कारखान्याची तिसऱ्या दिवशी चौकशी सुरूच

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

नंदुरबार : जिल्ह्यातील समशेरपुर येथील आयान मल्ट्रीट्रेड एलएलपी साखर कारखान्यावर (Sugar factori) आयकर विभागाने (Income Tax Department) गुरूवारी (ता.७) सकाळी धाड टाकून चौकशी सुरू केली होती. दुसऱ्या दिवशी देखील चौकशी सुरूच होती. आज तिसऱ्या दिवशी देखील चौकशी सुरूच असून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची संख्या वाढलेली असल्याची माहिती समोर येत आहे. हा साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांचा असल्याचे बोलले जाते आहे.

हेही वाचा: कर्नाटक राज्यातील लुट प्रकारणाचे कनेक्शन यावल शहरात

उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाच्या धाडी गेल्या तिन दिवसापूर्वी पडलेल्या होत्या. यात काही सहकारी साखर कारखान्यांचा समावेश होता. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एल एल पी साखर कारखान्यावर गुरूवारी सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांद्वारे झाडाझडती सुरु केली होती. गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या चौकशी दरम्यान कोणाला कारखान्यामध्ये मध्ये जाण्यास कोणालाही परवानगी दिली जात नाही आहे. तसेच नेमकी चौकशी कशाची सुरू आहे याची तिन दिवस झाले तरी माहिती समोर आलेली नाही.

तपासणीसाठी अधिकाऱ्यांची संख्या वाढली

पहिल्या दिवशी आयकर विभागाचे अधिकारी यांच्याकडून साखर कारखाना येथे चौकशी सुरू होती. पोलिसांची मदन न घेता आयकर विभागाने सीआरपीएच्या पथकाचे मदत घेतली होती. तर आज तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची संख्या वाढली असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा: अनाथ झालेल्या मुलांच्या मागे शासन खंबीरपणे उभे-मंत्री पाटील

सचिन शिंगारे पार्थ पवारांचे निकटवर्तीय

हा कारखाना तत्कालीन माजी आमदार प्र.भा. चौधरी उर्फ मोहन चौधरी यांनी 1996 मध्ये पुष्प दंतेश्वर या नावाने सुरू केला श्री. चौधरी यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव मुकेश चौधरी यांनी तो काही वर्ष सुरळीत चालवला, मात्र कारखाना संकटात सापडल्याने त्यावरील कर्जाचा बोजा कमी होऊ शकलेला नव्हता त्यामुळे शासनाने हा कारखाना अवसायनात काढून विक्री केला आहे. सध्या कारखान्याचे मालक सचिन शिंगारे असून त्यांनी कारखान्याचे नाव बदलून आयाम मल्टीस्टेट साखर कारखाना असे केले. श्री शिंगारे हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे.

loading image
go to top