esakal | साथरोगांचे थैमान..मनपाची कुंभकर्णी झोप; भाजपचे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Municipal Corporation BJP Movement

साथरोगांचे थैमान..मनपाची कुंभकर्णी झोप; भाजपचे आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


जळगाव : शहरात डेंगी, मलेरिया आदी साथीच्या रोगांनी (Disease)थैमान घातलेले असताना महापालिकेतील (Jalgaon Municipal Corporation) सत्ताधारी व प्रशासन कोणत्याही उपाययोजना न करता कुंभकर्णी झोप घेत आहे, त्याचा निषेध म्हणून भाजप जिल्हा महानगरतर्फे (BJP) गुरुवारी महापालिकेच्या आवारात तीव्र आंदोलन (Movement) करण्यात आले. सत्ताधाऱ्यांचा निषेध म्हणून भाजपने धुरळणी यंत्राचे प्रतीकात्मक पूजन करत घोषणा दिल्या.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात एकाच दिवसात लसीकरणाची ‘लक्षाधीश’ मजल


जळगाव शहरात दोन महिन्यांपासून साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. मलेरिया, डेंगी, फ्लूने नागरिक आजारी पडत असून, प्रत्येक घरात रुग्ण आढळत आहे, अशी स्थिती असताना जळगाव महापालिकेतर्फे कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नाहीत. पावसाळ्यात ठिकठिकाणी डबके साचले असून, कचरा उचलला जात नाही. डबक्यांमध्ये फवारणीही केली जात नाही. फवारणी करणारी १५ मशिन धूळखात आहेत. त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले.

हेही वाचा: धक्कादायक! मायलेकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या


यांची होती उपस्थिती

स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे- पाटील, माजी महापौर सीमा भोळे, सदाशिवराव ढेकळे, गटनेते भगत बालाणी, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्‍याम चौधरी, नितीन इंगळे, दीपक साखरे, महिला प्रदेश उपाध्यक्ष उज्ज्वला बंडाळे, नगरसेवक कैलास सोनवणे, महेश चौधरी, ॲड. शुचिता हाडा, दीपमाला काळे, अमित काळे, किशोर चौधरी, डॉ. चंद्रशेखर पाटील, जितेंद्र मराठे, गायत्री राणे, सुरेखा तायडे, मयूर कापसे, जिल्हा पदाधिकारी प्रा. जीवन अत्तरदे, राजू मराठे, वंदना पाटील, प्रकाश पंडित, महिला आघाडी अध्यक्षा दीप्ती चिरमाडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

loading image
go to top