esakal | जळगाव जिल्ह्यात एकाच दिवसात लसीकरणाची ‘लक्षाधीश’ मजल
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

जळगाव जिल्ह्यात एकाच दिवसात लसीकरणाची ‘लक्षाधीश’ मजल

sakal_logo
By
सचिन जोशी


जळगाव : गेल्या आठवड्यापासून लशींचा बऱ्यापैकी साठा उपलब्ध होत असल्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची (Corona Vaccination) मोहीम वेग धरू लागली आहे. सलग दुसऱ्या दिवशी एकाच दिवसात लाखाहून अधिक जणांना डोस दिल्याचा विक्रम झाला. तर जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाखांपेक्षा जास्त लाभार्थींना लस देण्यात आली.

हेही वाचा: धक्कादायक! मायलेकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या


जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपासून लसीकरणाचा वेग वाढला आहे. लसीकरणाच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातही लशींचा पुरेसा साठा मिळत नसल्याने लसीकरण संथगतीने सुरू होते. मात्र गेल्या आठवड्यापासून लसीकरणाने वेग धरला आहे. त्या तुलनेत लशींच्या साठ्याची उपलब्धताही वाढली आहे.


लाखाहून अधिक डोस
मंगळवारी जळगाव जिल्ह्यासाठी दोन लाखांहून अधिक लशींचे डोस प्राप्त झाले होते. त्यापैकी कोव्हिशील्ड लशीचे दोन लाखांवर तर कोव्हॅक्सिनचे आठ हजारांवर डोस मिळाले होते. जळगाव शहरासाठी त्यातून २४ हजार डोस उपलब्ध होते. त्यामुळे बुधवारी जळगाव शहरात केवळ मनपातील केंद्रांवर सहा हजार ६२ एवढे विक्रमी लसीकरण झाले. तर जिल्ह्याचा आकडा लाखावर पोचला होता.


गुरुवारीही ‘लक्षाधीश’
गुरुवारीही जिल्ह्यातील शंभराहून अधिक केंद्रांवर लसीकरण मोहीम वेगाने पार पडली आणि गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी एक लाखापेक्षा अधिक नागरिकांनी लशीचे डोस घेतले. पहिला डोस घेणाऱ्यांचा आकडा ९९ हजार ७२२, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १७ हजार १६८ अशा एकूण एक लाख १६ हजार ८९० लाभार्थींनी गुरुवारी लस घेतली. जिल्ह्यात आतापर्यंत १२ लाख ३१ हजार १८ जणांनी पहिला, तर चार लाख १९ हजार ९६७ लोकांनी दुसरा अशा एकूण १६ लाख ५० हजार ९८५ जणांना लस देण्यात आली आहे. जळगाव शहरात आजही विक्रमी लसीकरण झाले. मनपाअंतर्गत केंद्र व सिव्हिल- रोटरी तसेच रेडक्रॉस केंद्र मिळून दिवसभरात आठ हजार ५५३ जणांनी लस घेतली. जिल्ह्यात अद्याप ३६ हजारांवर लशींचे डोस शिल्लक असून, शुक्रवारीही काही केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे.

हेही वाचा: नांद्रे परिसरात पावसाचा हाहाःकार, पिकांना मोठा फटका


दिवसभरात तीन नवे रुग्ण
दुसरीकडे बुधवारी जिल्ह्यात सहा रुग्ण आढळून आल्यानंतर गुरुवारी ही संख्या काहीशी घटली. दिवसभरात तीन रुग्ण जिल्ह्यातून समोर आले आहेत. पैकी दोन भुसावळ व एक पाचोरा तालुक्यातील आहे. दिवसभरात एक रुग्ण बरा झाला असून, आता सक्रिय रुग्णांची संख्या २५ झाली आहे.

loading image
go to top