esakal | धक्कादायक! मायलेकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

धक्कादायक! मायलेकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाचोरा: अंतुर्ली (ता. पाचोरा) येथे बुधवारी (ता. ८) रात्री विवाहित मुलासह त्याच्या आईने गावालगतच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदय पिळून टाकणारी घटना घडली. नितीन पंढरीनाथ पाटील (वय २४) असे मृत तरुणाचे व त्याच्या आईचे नाव प्रतिभा पंढरीनाथ पाटील (४५) असे आहे.

हेही वाचा: मालेगाव : जुन्या महामार्गासह प्रमुख रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण

नितीन याच्याकडे शेती असून, तो चांगल्याप्रकारे शेती करीत होता. घरची आर्थिक परिस्थितीही समाधानकारक आहे. त्याची पत्नी व आईही त्याला शेतीत मदत करीत असत, असे असताना त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले, असा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावत आहे. मायलेकाचे मृतदेह गुरुवारी (ता. ९) सकाळी गावालगतच्या विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळले.

त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. दोघांच्या आत्महत्येचे गूढ ग्रामस्थांपुढे आहे. विहिरीत पट्टीच्या पोहणाऱ्यांनी प्रथम आईचा मृतदेह काढला. नंतर मुलाचा मृतदेह गवसला. दोघांचे मृतदेह विच्छेदनासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

loading image
go to top