esakal | शंभर रुपये द्या..पोलिस ठाण्यात युवकाचा धिंगाणा!
sakal

बोलून बातमी शोधा

CRIME

शंभर रुपये द्या..पोलिस ठाण्यात युवकाचा धिंगाणा!

sakal_logo
By
टीम ई सकाळ


जळगाव ः ‘मला..शंभर रुपये द्या’ नायतर मी, इथंच हाताच्या नसा कापून आत्महत्त्या (Suicide)करतो अन्‌ तूमच नाव फसवतो, असे म्हणत एका तरूणाने शहर पोलिस ठाण्यात (city police station) दिडतास धिंगाणा घातला. स्वतःच्या हातावर सपा-सप धारदार पट्टीने वार करून रक्तबंबाळ तरुणाला बघुन पोलिसांची (Police) भंबेरी उडाली. त्याची समजुत काढत..उपचारालाही रवाना करण्यात आले. अशात ऐका देाघांच्या खाकी वर्दीवरही या रक्ताचे डाग लागले. हा सर्व गोंधळ कुठे बाजारात, रेल्वेस्थानकावर नाही तर...चक्क शहर पोलिस ठाण्यात झाला. जखमी सागर महारु सपकाळे ऊर्फ सागर पट्टी याच्या विरुद्ध गुन्हा (crime case) दाखल करण्यात आला आहे. ( jalgaon city police station youth argument )

हेही वाचा: हतनूर धरणाचे १० दरवाजे पूर्ण उघडले; सतर्कतेचा इशारा

ऐरवी पेालिस दंडूक्याचा धाक दाखवुन...लोकांना घाबरवतांना आपण सर्वांनीच बघीतले असावेत, काही धाकदपट शाही करून पैसा उकळणारेही पोलिस असतात. शंभर-दोनशेच्या चिरीमिरी पासून ते थेट शंभर कोटी पर्यंतची मजल गाठणाऱ्या वाझे प्रकरणाने महाराष्ट्र पेालिस दलास बदनाम करुन सोडले आहे. पण, नियमाने ८ ते १४ आणि १४ ते ८ परत नाईट अशी प्रामाणीक ड्युटी करणार्या गरीब पोलिसांवर कधी कधी बाका प्रसंग ओढवतो. तसाच प्रकार दुसर्यांदा शहर पोलिस ठाण्यात घडला. दोन वाजेनंतर पोलिस ठाण्यात कुठले काम नसले तर, प्रभारी दुय्यम अधिकारी आणि डीबी कर्मचारी घरी निघुन जातात लंच ब्रेक नंतर वाम कुक्षी घ्यावी लागत असल्याने पुन्हा संध्याकाळी हा लवा-जमा परत येतो. तो पर्यंत ठाणे अंमलदार, गार्ड कर्मचारी यांच्यावरच पोलिस ठाण्याची मदार असते. आणि नेमके त्याच वेळेस (दुपारी ४ः३०) सागर पट्टी शहर पोलिस ठाण्यात धडकला. ड्युटीवरील कर्मचार्यांना तो, पैसे मागू लागला...कर्मचारीही अवाक्‌ झाले...एक-दोन त्याचे प्रताप ओळखत असल्याने त्यांनी दरडावण्याचा प्रयत्न केला.मात्र, त्याने हातावर सपा-सप लोखंडी कटरपट्टीने वार करण्यास सुरवात केली. एकामागून एक वार करत स्वतःला जखमी करून घेत आरडाओरड केली.


पोलिसांची भंबेरी...
जखमी सागरच्या आरेाळ्यांनी रस्त्यावरून ये-जा करणारेही थांबून गेले. रक्तस्त्राव होत असतांना त्याला पकडण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला मात्र, तो पुन्हा पुन्हा मारून घेत होता. त्याची समजुत काढून पैसे देण्यास होकार देताच...त्याची मागणी वाढली..लगेच त्याच्याशी गोड बोलून एकदोघांनी त्याला पकडले..पट्टी हिसकावुन रुग्णालयात रवाना केले. रात्री ११ वाजता या प्रकरणी आत्महत्त्येचा प्रयत्न शासकिय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी सागर सपकाळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: राष्ट्रवादीच्या बैठकीत गटबाजीवर चालले मंथन

नेहमीचा प्रकाराने पोलिसांना उबग आलायं
या अगोदर कोणीतरी पोलिस त्याला घाबरुन दारु पेण्यासाठी पैसे द्यायचे...म्हणुनच त्याला सवय झाली, याआधी त्याने शनिपेठ आणि शहर अशा दोन्ही पेालिस ठाण्यात तीन वेळा असा प्रकार करुन गोंधळ घातला आहे. पोलिस ठाण्यात ड्युटीवर असलेला ठाणे अंमलदार हा..आठ तासांचा जबाबदार असतो, आपल्या ड्युटीत काही नको..याचीच तो माळ जपत असतो. उपद्व्यापी सागर सपकाळे याने जर स्वतःला मारतांना नस वैगेरे कापून त्याचा मृत्यु ओढवला..तर, नको चौकश्या, साहेबांचे वाईट बोल, कारवाई म्हणुन साधे पोलिस घाबरुन असता त्याचाच तो, गैरफायदा घेतो. त्याच्यावर प्रभारी अधिकाऱ्यांनी वरीष्ठांच्या मार्गदर्शनात प्रभावी कारवाई करावी अशी मागणी कर्मचार्यांतर्फे होत आहे

loading image