esakal | हतनूर धरणाचे १० दरवाजे पूर्ण उघडले; सतर्कतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Hatnur dam

हतनूर धरणाचे १० दरवाजे पूर्ण उघडले; सतर्कतेचा इशारा

sakal_logo
By
टीम ई सकाळ


भुसावळ : विदर्भ आणि मध्यप्रदेश जोरदार पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या (Hatnur dam) पाणलोट क्षेत्रात पुन्हा पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे १० दरवाजे (Dam Get) पूर्ण उघडण्यात आले आहेत. सध्या १३ हजार ५६० क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग (Discharge of water) सुरू असल्याने तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा (Warning to the villages) देण्यात आला असल्याची माहिती हतनूर धरणाचे शाखा अभियंता एन. पी. महाजन यांनी दिली आहे.

( jalgaon district hatnur dam ten gets open villages warning)

हेही वाचा: राष्ट्रवादीच्या बैठकीत गटबाजीवर चालले मंथन


मध्य प्रदेशात आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तापी- पूर्णा नदीला पूर आला असून, हतनूर धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने गुरुवारी (ता. १५) सकाळी सहाला धरणाचे १० दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. तापी नदीपात्रात १३ हजार ५६० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे तापी नदीची पाणीपातळी वाढून तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. बुधवारी (ता. १४) पाणी कमी झाल्याने धरणाचे १० दरवाजे बंद करून केवळ सहाच दरवाजे उघडण्यात आले होते. आज पुन्हा पाण्याची आवक वाढल्याने आता १० दरवाजे सुरू ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचा: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण; बाजारपेठेत होतेय गर्दी!

पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता
भुसावळसह तालुक्यात गुरुवारी (ता. १५) दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हतनूर धरण क्षेत्रात गेल्या २४ तासात ११.१८ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुढील २४ तासांत पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी नदी काठावर जाऊ नये. आपली गूर-ढोरे नदीकाठी जाऊ देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षितस्थळी हलवावी. नदीकाठावर असलेले उपसा पंप तत्काळ सुरक्षितस्थळी हलवावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.

loading image