esakal | जळगाव पून्हा हादरले..सलग दुसऱ्या दिवशी खून
sakal

बोलून बातमी शोधा

crime

जळगाव पून्हा हादरले..सलग दुसऱ्या दिवशी खून

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः जळगाव शहरात सलग दुसऱ्या दिवशी खून (Murder) झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. आज जळगाव शहरातील आंबेडकर नगरात एका व्यक्तीचा खुन झाल्याची घटना घडकिस आली आहे. रविवारी दोन मुलांनी पित्याचा खून केल्याची घटना ताजी असतांना आज सकाळी पून्हा शहरातील दाट वस्तीत खून झाल्याची ही घटना घडल्याने शहर पून्हा हादरले आहे.

हेही वाचा: आईच्या चारित्र्यावर बापाचा संशय..पित्याचा दोघा मुलांकडून खून

जळगाव शहरात रविवारी निमखेडी शिवार परिसरात दोन मुलांनी बापाचा खून केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. त्यातच आज जळगाव शहरातील रथ चौका जवळ असलेल्या आंबेडकर नगरात एका व्यक्तीचा डोके ठेचून खुन झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनूसार राजू पंडीत सोनवणे मृत व्यक्तीचे नाव असून घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले आहे.

हेही वाचा: जळगावकर सावधान..चार दिवसांत वाढले कोरोनाचे दहा रुग्ण

सलग दुसऱ्या दिवशी खून

जळगाव शहरात सद्या गुन्हेगारी प्रचंड वाढत असून चोरी, मारामारी, खुनाच्या घटना वाढत आहे. त्यात सलग दुसऱ्या दिवशी जळगाव शहरात खून झाला आहे. त्यामुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.

loading image
go to top