जळगाव जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण; केळी पिकांवर परिणाम !

देविदास वाणी
Monday, 14 December 2020

गेल्या तीन दिवसा पासून सूर्यदर्शन झालेले नाही. शेतकरी चिंतेत आहेत. रब्बीमध्ये कोरडवाहू हरभरा, दादर ज्वारी, गहू या पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे.

जळगाव ः जिल्हयात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरण आजही काम होते. गारपीट, वादळ, विजांचा कडकडाट नूकसान झाले नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. या प्रतिकूल वातावरणामुळे स्वच्छ सूर्यप्रकाशाचा अभाव आहे. केळी पिकाची वाढ कमी होण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. 

आवश्य वाचा-  'प्री वेडिंग' शूटमध्ये आता असेही फॅड; फिल्मी दुनियेला ठेवले दूर

गेल्या तीन दिवसा पासून सूर्यदर्शन झालेले नाही. शेतकरी चिंतेत आहेत. रब्बीमध्ये कोरडवाहू हरभरा, दादर ज्वारी, गहू या पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. तर मका, बाजरी, कांदा लागवड, पेरणी सुरू आहे. पेरणी ठप्प आहे. इतर कामांवर परिणाम झाला आहे. अधूनमधून हलका पाऊस येत आहे. यामुळे सकाळपासून थंड वातावरण राहत आहे. दुपारीदेखील थंडी जाणवत आहे. तर पहाटे धुके दाटून येत आहे. कुठेही जोरदार किंवा मध्यम स्वरुपाचा पाऊस झालेला नाही. परंतु हलक्या पावसाने, ढगाळ वातावरणाने जमिनीतील आर्द्रता वाढली आहे. 

गेल्या २४ तासात जळगाव व अमळनेर मध्ये चार मिलीमिटर, पाचोरा येथे सात मिलीमिटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सातपुड्यातील चोपडा, रावेर येथेही हलका पाऊस झाला आहे. गारठा वाढला आहे. यामुळे दुपारीदेखील उबदार कपड्यांचा वापर करावा लागत आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon cloudy weather in Jalgaon district for the third day