ग्रामपंचायतीच्या प्रारूप मतदार याद्यामध्ये गोंधळात गोंधळ 

देविदास वाणी
Tuesday, 1 December 2020

कोरोना संसर्गाचा प्रसार झाल्याने सर्वच निवडणुकांना आयोगाने स्थगिती दिली. आता फेब्रुवारीत संबंधित ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील.

जळगाव : जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतीच्या मतदार याद्या आज प्रसिध्दीची तारीख होती. आज दूपारपर्यंत मतदार याद्या तहसिल कार्यालयातच होत्या. दुपारनंतर काही ग्रामपंचायतींना मतदार याद्या मिळाल्या. मात्र त्यातही वॉर्डाची फेररचना करताना या वाडातील मतदाराचे नाव दुसऱ्या वार्डात, दुसऱ्या वॅाडार्तील मतदाराचे तिसऱ्याच वार्डात असा घोळ असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

वाचा- महापालिकेची समिती पोहचली जिल्हा कारागृहात; आणि केली याची पाहणी -

मतदार याद्या तयार करताना दुबार नावे वगळण्यात आलेली नाहीत, जे स्थलांतरीत झाले त्यांचही नावे काढली नाहीत, मयतांची नावेही त्याच याद्यांमध्ये असल्याच्या तक्रारी मतदारांनी व्यक्त केल्या आहेत. 

जिल्हयातील ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका फेब्रुवारी-२०२१ मध्ये होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने निवडणूक आयोगाने निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदारयाद्या आज प्रसिद्ध झाल्या आहेत. ठिकठिकाणी मतदारांनी आपले मतदार याद्यामध्ये नावे आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी दुपारनंतर गर्दी केल्याचे चित्र होते. 

मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका कोरोनामुळे रखडल्या आहेत. मार्चमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची निवडणूकप्रक्रिया जानेवारी, फेब्रुवारी २०२० मध्ये सुरू झाली होती. प्रभागरचना, वॉर्डरचना यांची तयारी सुरू होती. तोच कोरोना संसर्गाचा प्रसार झाल्याने सर्वच निवडणुकांना आयोगाने स्थगिती दिली. आता फेब्रुवारीत संबंधित ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील, अशी अपेक्षा ठेवून निवडणूक आयोगाने मतदारयाद्यांच्या प्रसिद्धी, हरकती, अंतिम मतदारयाद्यांची प्रसिध्दीचे आदेश दिले आहेत. 

आवश्य वाचा-  कुटूंब अजूनही निशब्‍द..मित्रांच्‍या डोळ्यातील पाणी आटेना
 

ग्रामीण भागात निवडणूकीचा रंग  

जळगाव तालुक्यातील असोदा, भादलीसह अनेक मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका होणार आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडूका होणार आहेत. यामुळे ग्रामीण भागात निवडणूकांचे वातावरण तयार होत आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon confusion in the draft voter list of the gram panchayat