कंटेनर महामंडळाचे युनिट सुरू करण्याबाबत हालचाली 

देविदास वाणी
Sunday, 26 July 2020

केळी, कापूस, डाळींसह विविध प्रकारचा जळगाव, धुळे व परिसरातील माल मुंबई, पुणे, नागपूरसह विविध ागात निर्यात होता होता कच्चा मालाची आयात भुसावळ येथील कंटेनर महामंडळाच्या युनिट मधून होत होती.

जळगाव : भुसावळ येथील कंटेनर महामंडळाचे युनिट बंद झाले आहे. यामुळे जळगाव, धुळे जिल्ह्यातून परराज्यात, देशात होणारी निर्यात व आयात बंद झाली आहे. युनिट बंद झाल्याने वर्षाला होणारी १५०० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. हे युनिट सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील खासदार उन्मेश पाटील, खासदार रक्षा खडसे यांनी पुढाकार घेण्यास सुरवात केली आहे. 
केळी, कापूस, डाळींसह विविध प्रकारचा जळगाव, धुळे व परिसरातील माल मुंबई, पुणे, नागपूरसह विविध ागात निर्यात होता होता कच्चा मालाची आयात भुसावळ येथील कंटेनर महामंडळाच्या युनिट मधून होत होती. जळगाव जिल्हयातील सुमारे २५ निर्यातदारांसमोर माल निर्यातीचा प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. सोबतच अनेक कर्मचारी, कामगार बेरोजगार झाले आहे. याबाबत‘सकाळ’ने आज ‘निर्यातीला ब्रेक, वार्षिक १५०० कोटींची उलाढाल ठप्प, कंटेनर महामंडळाच्या भुसावळ युनिट बंदचा फटका, शेकडो कामगार बेरोजगार’ अशी आज बातमी प्रसिध्द केली आहे. त्यावर खासदारांनी पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. 

खासदार उन्मेश पाटील म्हणाले, कंटेनगर महामंडळाचे कार्यकारी संचालक, रेल्वेचे अधिकारी यांनी तोट्यातील कंटेनर विभाग बंद करण्याचे ठरविले आहे. महाराष्ट्रात असे २२ युनिट आहेत जे बंद आहे. त्याबाबत कार्यकारी संचालक, रेल्वे मंत्रालयाशी मी बोललो असून निर्यातीचा मोठा प्रश्‍न जिल्ह्यात झाला असल्याचे सांगितले आहे. पुढील आठवड्यात दिल्लीत या अधिकाऱ्यांनी बैठकीसाठी वेळ दिला. त्यात कंटेनर युनिट सुरू करावे अशी आ्ग्रही मागणी करू. 

खासदार रक्षा खडसे म्हणाल्या, कंटेनगर महामंडळ व रेल्वे यामध्ये जागेच्या भाड्यावरून वाद आहेत. देशभरात ही अडचण आहे. या दोघांमधील वाद मिटविला गेला पाहिजे. भुसावळचे युनिट सुरू करण्याबाबत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. लॉकडाउन असला तरी रेल्वे मंत्रालयाशी याविषयावर बोलून युनिट सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. 

 

संपादन : राजेश सोनवणे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon contener unit again open Movement