भय इथले संपत नाही...जिल्ह्यात वीस पटीने वाढ

corona positive
corona positive
Updated on

जळगाव : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज जिल्ह्यात कोरोनाचे 44 नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्याचा आकडा 1001 वर जावून पोहचला असल्याने जिल्ह्यातील बाधितांची कोरोनाची हजारी ओलांडली आहे. तसेच जिल्ह्यातील बाधितांची संख्या वीस पटीने वाढत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. 

देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा दोन लाखांपेक्षा अधिक गेला आहे. यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने राज्याचा देशात अव्वल स्थानी आहे. तसेच जिल्ह्यात देखील दररोज कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढत असल्याने वैद्यकीय यंत्रणा देखील आता तोडकी वाटू लागली आहे. आज दिवसभरात जिल्हाभरात 44 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 1001 वर जावून पोहचला असल्याने जिल्ह्याने देखील हजारी पार केली आहे. मात्र तरी देखील नागरिकांकडून कोरोनाबाबत घालून देण्यात आलेल्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र सर्वदूर दिसून येत आहे. 

अमळनेरमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर 
जिल्ह्यात सुुरुवातीला हॉटस्पॉट म्हणून घोषीत झाले होते. मात्र गेलया काही दिवसांपासून अमळनेरमध्ये कोरोनाची साखळी तुटल्याने याठिकाणी अत्यंत तुरकळ स्वरुपात रुग्ण आढळून येत होते. मात्र आज पुन्हा अमळनेरमध्ये कोरोनाचे 10 रुग्ण आढळून आल्याने अमळनेरात कोरोनाचा कहर पुन्हा सुरु झाल्याचे दिसून येत आहे. 

असे आढळले रुग्ण 
संपूर्ण जिल्ह्यात शहरापासून ते गावांमध्ये देखील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. आज 44 नवे रुग्ण आढळून आले असून यामध्ये जळगावशहरात 19, भुसावळ 5, अमळनेर 10, चोपडा 9, धरणगाव 4, जामनेर 2, रावेर 6, चाळीसगाव 2 तर एरंडोल येथे एक असे रुग्ण आढळून आले आहे. 

शहर ठरतय हॉटस्पॉट 
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास जिल्हा प्रशासन कमी पडत आहे. त्यामुळे दररोज शहरात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे. आज शहरात तब्बल 19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये जयकिसन वाडी परिसरातील 6, गणेशपुरी(मास्टर कॉलनी) 5, उत्तमनगर, सालार नगर व शाहूनगरातील प्रत्येक 1 असे आज 14 नवे रुग्ण आढळून आले आहे. तर शुक्रवारी रात्री उशीरा खासगी लॅबचे रिपोर्ट प्राप्त झाले असून शाहू नगरातील 5 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com