esakal | बापरे...जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचाही "2020' 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

जिल्ह्यासाठी मागील आठवडा अधिक बिकट ठरला. कारण सलग तीन दिवस कोरोना बाधितांचा आकडा शंभरच्या वर निघाला होता. यानंतर काहीसा बाधितांच्या आकड्यावर काहिसा अंकूश लागल्यानंतर आज पुन्हा शंभरच्या वर रूग्ण आढळून आले असून आज दिवसभरात 135 रूग्ण आढळून आले आहेत.

बापरे...जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचाही "2020' 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील कोरोना व्हायरसचा वाढणारा प्रादुर्भाव धोक्‍याची घंटा देणारा आहे. गेल्या चार- पाच दिवसांपासून कमी आकडा निघाल्यानंतर आज पुन्हा शंभरच्यावर पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने जिल्ह्याला मोठा हादरा बसला आहे. यातच जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या दोन हजाराच्या वर गेली असून 2020 इतके रूग्ण झाले आहेत. 

वर्षातील पहिले सुर्यग्रहण रविवारी; जळगावात कशी असेल स्थिती...


जगात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरस जळगाव जिल्ह्यात पाय पसरू लागला आहे. जिल्ह्यासाठी मागील आठवडा अधिक बिकट ठरला. कारण सलग तीन दिवस कोरोना बाधितांचा आकडा शंभरच्या वर निघाला होता. यानंतर काहीसा बाधितांच्या आकड्यावर काहिसा अंकूश लागल्यानंतर आज पुन्हा शंभरच्या वर रूग्ण आढळून आले असून आज दिवसभरात 135 रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यासाठी हा सर्वात मोठा धक्‍का बसला असून, एकूण बाधितांची संख्या दोन हजाराच्यावर पोहचली आहे. 

चोपडा, जळगाव शहरात सर्वाधिक 
कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांची संख्या यापुर्वीच जळगाव शहर आणि चोपड्यात सर्वाधिक आहे. यात आज वाढलेल्या आकड्यांमध्ये देखील जळगाव आणि चोपड्यात सर्वाधित रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहरात 21 आणि चोपड्यात सर्वाधित 23 रूग्णांचा समावेश आहे. 

अशी वाढली संख्या (एकूण बाधित) 
जळगाव शहर 21 (338), जळगाव ग्रामीण 5 (68), भुसावळ 11 (338), अमळनेर 16 (252), चोपडा 23 (164), पाचोरा 3 (49), भडगाव 1 (96), धरणगाव 8 (99), यावल 6 (106), एरंडोल 8 (64), जामनेर 12 (99), रावेर 8 (150), पारोळा 13 (114). 

loading image
go to top