esakal | मुस्लिम तरुणांकडून मानवता धर्माचे घडले प्रत्यक्ष दर्शन

बोलून बातमी शोधा

मुस्लिम तरुणांकडून मानवता धर्माचे घडले प्रत्यक्ष दर्शन
मुस्लिम तरुणांकडून मानवता धर्माचे घडले प्रत्यक्ष दर्शन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कासोदा : मानवता हा धर्म फक्त बऱ्याच वेळा पुस्तकात वाचायला व ऐकायला मिळतो. परंतु कासोद्यात त्याचे प्रत्यक्ष दर्शनच घडले. सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून, यावर सरकार प्रशासनाने वेगवेगळे निर्बंध लावून दिले आहे.

हेही वाचा: शिक्षण विभागाचा मदतीचा ‘ऑक्सिजन’

याच कोरोनामुळे तीन मुली व एक मुलगा असलेल्या वयोवृद्ध महिला शांताबाई भाऊराव बाविस्कर (वय ७४) या महिलेचे शनिवारी (ता. २४)सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ही वृद्ध महिला गेल्या चार ते पाच दिवसांपासून आजारी असल्यामुळे या महिलेच्या अंत्यविधीस पोटची मुले व मुली तसेच नातेवाईक यापैकी कोणीही कोरोना असेल या संशयाच्या भीतीने पुढे येत नसल्याचे पाहून येथील मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांनी ही घटना पाहिल्यावर अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी अशपाक अली यांनी व त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य अर्शद अली मुखतार अली, सद्दाम पिंजारी, मुश्रीफ पठाण, अमजद खान जाकीरअली, रियाज शेख, नफीस शेख, जमील पिंजारी, तजमुलशेख मुरसलीन शेख, तोसिफ शेख आदी मुस्लिम समाजबांधवांनी पुढाकार घेऊन या महिलेचा हिंदू रितीरिवाजानुसार रात्री उशिरा अग्निडाग देऊन अंत्यसंस्कार करून पवित्र रमजान महिन्यात हिंदू - मुस्लिम एकता अबाधित ठेवण्याचे काम या सर्वांनी पुढाकार घेत कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर केल्याने त्यांचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे