esakal | कोरोनामुळे २२ लाख मुले शाळाबाह्य-आमदार डॉ. सुधीर तांबे
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Dr. Sudhir Tambe

कोरोनामुळे २२ लाख मुले शाळाबाह्य-आमदार डॉ. सुधीर तांबे

sakal_logo
By
सचिन जोशी


जळगाव : कोरोनामुळे (Corona) शाळा, महाविद्यालये बंद (Schools, colleges closed)असताना, आता मुले शाळाबाह्य होण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. वर्ष-दीड वर्षात जवळपास २२ लाख मुले शाळाबाह्य (Out of school child) झाल्याची धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणातून (Survey) समोर आली आहे, अशी माहिती आमदार डॉ. सुधीर तांबे (MLA Dr. Sudhir Tambe) यांनी सोमवारी येथे दिली.

हेही वाचा: रेल्वे किमेनची सतर्कता आणि धाडसामूळे मोठी दुर्घटना टळली..!


‘सकाळ’च्या जळगाव शहर कार्यालयात सोमवारी डॉ. तांबे यांनी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. शाळा बंद असल्याने शिक्षणसंस्था, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागत असून, त्यामुळे शाळा सुरू करण्यासंबंधी आम्ही आग्रही आहोत. याबाबत या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत ही भूमिका लावून धरू, असेही ते म्हणाले.
डॉ. तांबे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून, त्यांनी सोमवारी ‘सकाळ’ कार्यालयास सदिच्छा भेट देत विविध विषयांवर चर्चा केली. ते म्हणाले, की शाळा बंद असल्याने मुले एकलकोंडी होत आहेत. ऑनलाइन शिक्षण चांगला पर्याय होऊ शकत नाही किंवा तो शाश्‍वत उपायही नाही.


...तर शिक्षण प्रक्रिया अपूर्ण
शिक्षक आणि विद्यार्थ्याचा प्रत्यक्ष संवाद, संपर्क झाल्याशिवाय शिक्षणाची प्रक्रिया पुढे जाऊ शकत नाही. विद्यार्थी शाळेत केवळ पुस्तकी शिक्षण घेण्यासाठी जात नाही, तर शाळेच्या परिसरात प्रवेश केल्यापासून ते काही ना काही शिकत असतात. त्यामुळे विद्यार्थी- शिक्षक संवाद प्रत्यक्षच होणे गरजेचे आहे.

हेही वाचा: चोपड्याच्या डॉ. देविका पाटीलचा जर्मनीत विक्रम; आयर्न मॅन स्पर्धा जिंकली

टास्क फोर्सची ‘ना’
शाळा सुरू करण्यासंबंधी शासन अनुकूल होते. मंत्रिमंडळाचीही त्यास सहमती होती. मात्र, ‘टास्क फोर्स’ने त्याला प्रतिकूलता दर्शवली व शाळा सुरू करण्याचा निर्णय होऊ शकला नाही. योग्य उपाययोजना व काळजी घेऊन शाळा सुरू करता येऊ शकता, अशा पर्यायांवर विचार करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. या वेळी त्यांच्यासमवेत प्रा. सुनील गरुड, शैलेंद्र खडके आदी उपस्थित होते.

loading image
go to top