esakal | चोपड्याच्या डॉ. देविका पाटीलचा जर्मनीत विक्रम; आयर्न मॅन स्पर्धा जिंकली
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Devika Patil

चोपड्याच्या डॉ. देविका पाटीलचा जर्मनीत विक्रम; आयर्न मॅन स्पर्धा जिंकली

sakal_logo
By
बालकृष्ण पाटील

गणपूर : नाशिक येथील डॉ.देविका पाटील हिने हांबुर्ग (जर्मनी ) (Germany) येथे आयर्न मॅन ही स्पर्धा (Iron Man competition) जिंकून ती भारतातील सर्वात वेगवान ॲथलिट (Athlete) होण्याचा मान मिळवला आहे. स्पर्धेत आठ ते दहा डिग्री तापमानात सकाळी चार किलो मीटर स्विमिंग करून चौदा ते पंधरा डिग्री तापमानात थंडगार वारे आणि भर पावसात १८० किलोमीटर सायकलिंग त्यानंतर ४२ किलोमीटर मॅरेथॉनचे (Marathon) अंतर पूर्ण केले. विशेष म्हणजे चोवीसतास चालणारी जागतिक पातळीवरील आयर्न मॅन स्पर्धा न थांबता डॉ. देविका पाटील हिने अवघ्या बारा तासात जिंकून राष्ट्रीय क्रिडा दिनी (National Sports Day) एक नवा विक्रम घडविणारी ती भारतीय महिला ठरली आहे.

हेही वाचा: कलयुगाच्या ‘श्रावणाने’ माता-पित्याला दाखविला मंदिराचा रस्ता

चहार्डी (ता.चोपडा) येथील रहिवाशी व सध्या नाशिक येथील सुप्रसिध्द नेत्ररोग तज्ञ डॉ. शरद पाटील व डॉ.अनिता पाटील यांची ती कन्या असून,चोसाकाचे माजी संचालक व भाजपचे जेष्ठ नेते जी.टी.पाटील यांची ती नात आहे. मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये डॉ.देविका पाटील मानसोपचार तज्ञ म्हणून काम करीत आहेत. कोविड संसर्ग काळात ड्युटी सांभाळून तिने गेल्या तीन वर्षांपासून शनिवार व रविवारी सराव करून आयर्न मॅन स्पर्धा जिंकली आहे. त्यासाठी डॉ.देविका पाटील यांना पुणे येथील चैतन्य वेल्लाळ यांचे मार्गदर्शन मिळाले.यापूर्वी तिने चार अर्ध आयर्न मॅन स्पर्धा जिंकल्या आहेत.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात..एका दिवसात लाखावर लसीकरण


पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या अर्ध आयन मॅन स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकाविला होता.
महाविद्यालयीन जिवनापासून डॉ.देविका पाटील ही विविध सायकल स्पर्धा, मॅरेथॉन व दीर्घ अंतरा च्या मॅरेथॉन स्पर्धा यात सातत्याने भाग घेत आहे.स्पोर्ट्स मेडिसीन या विषयात तिची आवड असून त्यात तिला पुढील करिअर करायचे आहे. त्यामुळे असंख्य खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होण्यासाठी मदत करण्याचा तिचा मानस आहे.

loading image
go to top