सलग तिसऱ्या दिवशी त्रिशतक; कोरोना बाधितांचा आकडा तेरा हजार पार 

सलग तिसऱ्या दिवशी त्रिशतक; कोरोना बाधितांचा आकडा तेरा हजार पार 

जळगाव : तीन दिवस सलग तीनशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असल्याने जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा तीनच दिवसांत हजारांनी वाढला. एकूण रुग्णसंख्या १३ हजारांपेक्षा अधिक झाली असून आज दिवसभरात दोनशे रुग्ण बरेही झाले. सर्वाधिक ७९ रुग्ण आज जळगाव शहरात आढळून आले. 


जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग हाताबाहेर गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तीनशेच्या पटीत नवे बाधित आढळून येत आहेत. जळगावसह अमळनेर, चोपडा, जामनेर, रावेर आदी ठिकाणे हॉटस्पॉट बनली आहेत. गेल्या २४ तासांत जळगाव जिल्ह्यात नवे ३२१ रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १३ हजार ८७वर पोचली आहे. दिवसभरात २०० रुग्ण बरे झाल्यामुळे हा आकडाही वाढून ९ हजार १४५ झाला आहे. गेल्या २४ तासांत ८ जणांचा मृत्यू झाला असून एकूण बळींची संख्या ५८४ झाली आहे. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर ७९, जळगाव ग्रामीण १२, भुसावळ १९, अमळनेर १५, चोपडा २०, पाचोरा १८, धरणगाव १८, यावल ९, एरंडोल ५१, जामनेर १५, रावेर ६, पारोळा ३, चाळीसगाव १८, मुक्ताईनगर ३६, बोदवड १. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com