
एकूण रुग्णांची संख्या ५५ हजार ९५० झाली आहे. बरे होणाऱ्यांचा आकडा ५४ हजार १७७ वर पोचला आहे. दिवसभरात एका ही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही
जळगाव : जिल्ह्यात साडेतीन महिन्यांपासून काही प्रमाणात नियंत्रणात असलेला कोरोनाचा संसर्ग वर्षअखेरीस पुन्हा डोके वर काढण्याची भीती निर्माण झाली आहे. तर गल्या तीन दिवसापासून पन्नाशीच्या वर येणारी नवीन रुग्णसंख्येचा आज तीस वर आली आहे. तर दिवसभरात ४४ रुग्ण बरे झाले तर एका ही रुग्णाचा मृत्यू आहे.
जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपासून पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. बुधवारी नव्या रुग्णांचा आकडा ८० वर पोचला होता. गुरुवारीही अवघ्या अकराशे चाचण्यांमधून ६० रुग्ण आढळून आले. तर शुक्रवारी ६६ रुग्णसंख्या आली होती. आज मात्र २९ नवीन बाधीत आढळल्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ५५ हजार ९५० झाली आहे. बरे होणाऱ्यांचा आकडा ५४ हजार १७७ वर पोचला आहे. दिवसभरात एका ही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
असे आढलेले रुग्ण
जळगाव ९, जळगाव ग्रामीण २, भुसावळ १, चोपडा ७, पाचोरा ३, यावल ४, पारोळा २, चाळीसगाव १